शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

‘पुनर्वसन’चा भोंगळ कारभार

By admin | Updated: March 4, 2016 21:35 IST

दोडामार्गातील प्रकार : आडनाव बदलून मोबदला डावलण्याची घटना

साटेली-भेडशी : तिलारी धरणग्रस्तांना वनटाईम सेटलमेंटची रक्कम देण्यासाठी सिंधुदुर्ग पुनर्वसन शाखेच्यावतीने दाखल्याची पडताळणी सुरू आहे. यामध्ये साटेली- भेडशी येथील संदेश चंद्रकांत पास्ते (रा. साटेली-भेडशी) या दाखला धारकाला नोटीस बजावत असताना त्याचे वडील नोकरीला लागले असल्याचे म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे ‘पास्ते’ आडनाव नामक दाखलाधारकाचे वडील ‘नाईक’ करण्याची किमया पुनर्वसन शाखेने करून दाखविली. याबाबत जोरदार चर्चा सुरू असून पुनर्वसन विभागाचा भोंगळ कारभार पुढे आला आहे.गेल्या तीस वर्षापासून तिलारी धरणग्रस्त आपल्या विविध मागण्यांसाठी शासन दरबारी झगडत आहेत. तिलारी धरण साकारावे, यासाठी एका नोकरीचे आमिष तत्कालीन सरकारने दाखविले होते. मोठ्या मनाने पिढीजात संपत्तीचा त्याग करत पाल, पाटये, आयनोडे, सरमळे, शिरंगे आदी गावांचे झरेबांबर, साटेली, बोडदे, सासोली आदी ठिकाणच्या माळरानावर पुनर्वसन करण्यात आले. तीस वर्षे झाली तरी संघर्ष न संपलेल्या धरणग्रस्तांतून काही वर्षापासून धरणग्रस्त संघर्षग्रस्त समिती स्थापन करून घरटी एक नोकरीऐवजी वनटाईम सेटलमेंटसाठी संघर्ष सुरू झाला. याचेच फलित म्हणून तत्कालीन आघाडी सरकारने नोकरीऐवजी एकरकमी पाच लाख अनुदान देण्याचे ठरविले. सत्तेवर आलेल्या सेना भाजप युती सरकारने याबाबतचा अध्यादेशही जारी केला. त्यानंतर धरणग्रस्तांचा वनटाईम सेटलमेंटचा प्रश्न सुटला असे वाटत असताना पुनर्वसन शाखेने आपणच दिलेल्या ९४७ दाखल्यांवर संशयाचे बोट ठेवले. त्यामुळे पुनर्पडताळणीत हा प्रश्न अडकला. ही पडताळणी करताना जिल्हा पुनर्वसन शाखेचा भोंगळ कारभार पुढे आला आहे. यामध्ये दाखलाधारक संदेश चंद्रकांत पास्ते याला नोटीस बजावताना त्यांचे वडील नोकरीला लागल्याचे म्हटले आहे. मात्र भलत्याचे नाव नोंदविल्याने पास्ते कुटुंबीयांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. संदेश पास्ते याला पत्र देताना त्यांच्या वडिलांचे नाव गोविंद अर्जुन नाईक असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पास्ते आणि नाईक असा वेगळा शोध पुनर्वसन खात्याने लावला आहे. या प्रकरणाने पास्ते कुटुंबीयांना पुनर्वसन खात्यात हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे या कुटुंबाला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. (वार्ताहर)पत्रामुळे मानसिक त्रास : संदेश पास्तेसंदेश चंद्रकांत पास्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या वडिलांना प्रकल्पग्रस्त दाखल्याद्वारे नोकरीमध्ये सामावून घेतलेले नाही. त्यामुळे जिल्हा पुनर्वसन खात्याने पत्रात नमूद केलेल्या गोविंद अर्जुन नाईक यांच्याशी आपला काहीही संबंध नाही. या पत्रामुळे माझ्यासह कुटुंबीयांना मानसिक व आर्थिक त्रास झाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.