शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

‘बल्क कुलर’ खरेदी संशयास्पद--सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 01:11 IST

कोल्हापूर : ‘गोकुळ’ प्रशासनाने पूर्वीच्या बल्क कुलर रकमेचा वापरही न करता अहवाल सालात २ कोटी ७२ लाखांची बल्क कुलरची नव्याने खरेदी कशासाठी केली, असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी संघाला पत्राद्वारे केला आहे.

ठळक मुद्दे : ‘गोकुळ’ प्रशासनाकडून शिल्लक रक्कम बॅँकेत ठेवताना निकष धाब्यावर

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘गोकुळ’ प्रशासनाने पूर्वीच्या बल्क कुलर रकमेचा वापरही न करता अहवाल सालात २ कोटी ७२ लाखांची बल्क कुलरची नव्याने खरेदी कशासाठी केली, असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी संघाला पत्राद्वारे केला आहे. संघाची शिल्लक रक्कम ठेवण्यासाठी संबंधित बॅँकेचा एनपीए पाहून सक्षमतेनुसार ठेवण्याचे आदेश सहकार विभागाचे असताना ते निकष धाब्यावर बसविण्याचे काम केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.बल्क कुलर बसविण्यासाठी दुग्ध विभागाची परवानगी घेतली आहे का? एकूण बल्क कुलर किती, त्यात जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर किती बसविले याची माहिती द्या. संघाकडील शिल्लक ५४ कोटी ३ लाख रक्कम चालू खात्यावर आहे.

ही रक्कम यूथ बॅँक, पार्श्वनाथ बॅँक, वीरशैव बॅँकेत ठेवली आहे. या बॅँकांचा नेट एनपीए शून्य टक्के आहे का? सहकार कायद्याचे उल्लंघन करण्यामागे कोणाचा ‘रस’ आहे? ठरावीक बॅँकांमध्ये विनाव्याज एवढी मोठी रक्कम ठेवण्यामागे संचालक मंडळाचा कोणता उद्देश आहे? गोकुळ शिरगाव, नवी मुंबई व पुणे येथे दुधाच्या वाहतुकीसाठी संघ मालकीचे टॅँकर्स वगळता उर्वरित १०० टॅँकर भाड्याने घेत असताना त्याच्या निविदा कशा मागविल्या? असे प्रश्न त्यांनी संघ व्यवस्थापनाला विचारले आहेत.

साधारणत: सर्वच संस्थांच्या सभा दुपारी एक वाजता ठेवल्या जातात; पण ‘गोकुळ’ने सकाळी अकरा वाजता बोलावली आहे. सभासद उपस्थित राहूच नयेत, यासाठी वेळ बदलल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.संघाने सर्वांना आॅनलाईन बॅँकीगची सक्ती केली मात्र ज्या ठिकाणी बॅँकिंग नेटवर्क नाही, अशा ठिंकाणी संघ काय व्यवस्था केली, अशी विचारणा आमदार पाटील यांनी केली आहे.सर्वसाधारण सभा उद्या; विरोधक थंडचलोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या, शुक्रवारी सकाळी अकरा वाजता संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात होत आहे. गेल्यावर्षी विरोधी गटाने आक्रमकपणे तयारी करत सत्तारूढ गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याने सभा गाजली होती; पण यंदा विरोधकांची तयारी पाहता नियमित प्रश्न वगळता फारसा आक्रमकपणा दिसण्याची शक्यता कमी आहे.गेल्यावर्षी निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्याच सभेत आमदार सतेज पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. पण यावेळेला त्यांच्या गटाने विहीत वेळेत ३४ लेखी प्रश्न विचारलेले आहेत. त्यामध्ये वाहतुकीचा ठेका देताना काढलेले टेंडर, त्यासाठी ५० लाख रुपये ठेवलेली बयाणा रक्कम, वाहनासाठी डिझेल-पेट्रोलवर झालेला ९६ लाखांचा खर्च त्याचबरोबर वाहनभाड्यावर दोन कोटींचा खर्च, वासाचे दूध असे विविध प्रश्न आमदार पाटील यांच्या गटाने केले आहेत.सतेज पाटील यांचे प्रश्नगोकुळ शॉपी अपहाराची रक्कम व्याजासह वसूल झाली का?नोकरभरतीसाठी कोणते निकष लावले, त्याला शासनाची मान्यता आहे का?बंद संस्थेकडील पशुखाद्याच्या थकबाकीबाबत कोणती कार्यवाही केली?संचालकांचा प्रवास खर्च मंजुरीपेक्षा जादा कसा?सर्वसाधारण गटातील तीन संचालक वाढीची कारण काय?दुय्यम प्रतीचे दूध किती? चांगल्या प्रतीच्या दूधवाढीसाठी काय प्रयत्न केले?तिसंगी येथील भेसळीबाबत संघाने कोणती कारवाई केली?