शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

१०५ ग्रामपंचायतींना इमारती उपलब्ध नाही

By admin | Updated: September 26, 2016 01:04 IST

जिल्हा परिषद : दोन वर्षांत एकही रूपया मिळाला नाही; १२ कोटी ६० लाखांची गरज

कोल्हापूर : जिल्ह्णातील १०५ ग्रामपंचायतींना सद्य:स्थितीत इमारती नसल्याचे चित्र असून यासाठी १२ कोटी ६० लाख रुपयांची आवश्यक्ता आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये इमारती बांधण्यासाठी एकही रुपया मिळाला नाही. गडहिंग्लज तालुक्यात सर्वच्या सर्व म्हणजे ८९ ग्रामपंचायतींना इमारती असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्णात १०३० ग्रामपंचायती आहेत. त्यातील ९२५ ग्रामपंचायतींना इमारती उपलब्ध आहेत. मात्र, १०५ ग्रामपंचायतींना इमारती उपलब्ध नाहीत. जुन्या झालेल्या इमारतीत अथवा भाड्याच्या जागेत अशा या ग्रामपंचायती कार्यरत आहेत. वास्तविक केंद्र आणि राजय शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी आता गावपातळीवर पाठविला जात आहे. ग्रामपंचायती सक्षम करण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अजूनही अनेक ग्रामपंचायतींना इमारती नाहीत हे वास्तव आहे. या १०५ ग्रामपंचायतींना इमारती बांधावयाच्या झाल्या तर प्रत्येक इमारतीला १२ लाख रुपये याप्रमाणात कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी १२ कोटी ६० लाख रुपयांची गरज आहे. दोन वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत राज्य प्रकल्प संचालकांनी राज्यभरातून किती ग्रामपंचायतींना इमारती नाहीत याची आकडेवारी मागवली होती. अनेक ठिकाणी छोट्या ग्रामपंचायतींच्या इमारती बांधताना कामाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने नव्या इमारतीही चार-पाच वर्षांत जीर्ण झाल्याचीही उदाहरणे घडली आहेत. अशाही गावांचे पदाधिकारी नव्या कार्यालयांसाठी आग्रही असल्याचे चित्र दिसून येते. मात्र, ठरावीक वर्षे झाल्याशिवाय अशा इमारतींसाठी पुन्हा नव्याने निधी देता येत नसल्याने काही ठिकाणी नव्या इमारतीही आता जुनाट झाल्याचे दिसून येते. तालुका व इमारतींची गरज भुदरगड- ७, राधानगरी- १०, गगनबावडा- १२, कागल-९, हातकणंगले -१,शिरोळ-२, शाहूवाडी-११, करवीर-१४, आजरा- ९, चंदगड-२५, पन्हाळा -५