शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ उभारू

By admin | Updated: March 1, 2017 00:35 IST

संजय घोडावत : उद्योगातून १० हजारांहून जास्त लोकांना रोजगार देण्यात आला

कोल्हापूर / जयसिंगपूर : ‘घोडे की नाल दरवाजे पे लगाने से कभी सक्सेस नहीं मिलता, घोडे की नाल पाव मे लगाने से ही सक्सेस मिलता है’. माणसाचे कष्ट त्याला यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचविते. यश मिळविण्यासाठी दुसरा कोणताही शॉर्टकट नाही,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावत यांनी त्यांच्या ५२ व्या वाढदिवसाच्या मनोगतामध्ये केले. उद्योगपती घोडावत म्हणाले, सन १९९२ ला मी सुरू केलेल्या छोट्याशा उद्योगातून आज जवळपास १० हजारांहून जास्त लोकांना रोजगार मिळाला. १२ हजारांहून जास्त विद्यार्थ्यांना आज शिक्षण देण्याचे काम संजय घोडावत इन्स्टिट्यूट करत आहे. खरंच आज या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे. इथे काम करणारा प्रत्येक जण आपले समजून पूर्ण तन्मयतेने झोकून देऊन कष्ट करतो, हे यशाचेच प्रतीक आहे. सकारात्मक विचार करा व प्रत्येक गोष्टीमध्ये सांघिक विचारशैली असणे गरजेचे आहे. मी आज ज्यांच्यावर विश्वास टाकला ते म्हणजे संस्थेचे विश्वस्त विनायक भोसले, सिव्हील विभागाचे प्रमुख वाय. डी. लोहाणा, संचालक डॉ. व्ही. ए. रायकर, प्राचार्य विराट गिरी, प्राचार्या मोहंती, वासू, जयाकुमारी यांनी आपल्या कामांतून तो सार्थ ठरविला आहे. लवकरच याठिकाणी विद्यापीठ स्थापित करून जगातील पहिल्या २०० विद्यापीठांमध्ये समावेश करण्याचा आमचा निश्चय आहे. यावेळी ५२ व्या वर्षी पायलट बनल्याबद्दल उद्योगपती घोडावत यांनी आनंद व्यक्त केला. या वाढदिवसाच्या कार्यक्रमास चित्रपट अभिनेते सैफ अली खान प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या हस्ते एसजीआयच्या ‘उमंग’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अभिनेते सैफ अली खान म्हणाले, शिक्षणच माणसाला समृद्ध बनविते. त्यामुळे प्रत्येकाने आयुष्यात जास्तीत जास्त पुस्तके वाचा. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनीदेखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, दानचंदजी घोडावत, नीता घोडावत, संस्थेचे सचिव श्रेणिक घोडावत, विश्वस्त विनायक भोसले उपस्थित होते. संचालक डॉ. व्ही. ए. रायकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सोहन तिवडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. फ्रँकी डिसुझा यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांचा गौरव या कार्यक्रमात अभिनेते सैफ अली खान यांच्या हस्ते इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, एमबीएमधून तीन विद्यार्थ्यांना ‘बेस्ट आऊटगोर्इंग स्टुडंटस्’ आणि उत्कृष्ट खेळाडूंना ‘बेस्ट प्लेयर पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.