शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

म्हशींचा रॅम्पवॉक

By admin | Updated: November 13, 2015 23:44 IST

अनोखा रोड शो : सातशेहून अधिक म्हशींचा सहभाग

कोल्हापूर : म्हशींच्या अंगावरील केसांवर केलेले कोरीव काम, शिंगे रंगवून त्यांवर रिबिनी, फुगे, मोरपिसे बांधून सजविलेल्या म्हशी आणि मालकांच्या हाकेसरशी मोटारसायकलमागे धावणाऱ्या म्हशींचा अनोखा ‘रोड शो’ पाहण्यासाठी सागरमाळ येथे शुक्रवारी सायंकाळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. निमित्त होते सागरोबा देवाच्या दर्शनाचे. शहरातील विविध भागांतून आलेल्या दुग्ध व्यावसायिकांनी दुपारी चार वाजल्यापासूनच सम्राटनगर येथील सागरमाळावरील सागरोबा देवाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. मोरेवाडी, पाचगाव, कंदलगाव, कळंबा, मंगळवार पेठ, जुना बुधवार पेठ, उत्तरेश्वर पेठ, गवळी गल्ली, दौलतनगर, रंकाळा टॉवर या कोल्हापुरातील दुग्ध व्यावसायिकांबरोबरच बेळगाव, सांगली, मिरज येथीलही दुग्ध व्यावसायिक या अनोख्या रोड शोमध्ये सहभागी झाले होते. सागरोबाच्या दर्शनानंतर येथे आयोजित म्हशींचा अनोखा रोड शो पाहण्यासाठी नगारिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी मालकांच्या मोटारसायकलच्या हॉर्नच्या इशाऱ्यावर किंवा मालकांच्या एका हाकेवर धावणाऱ्या म्हशी पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जो तो आपल्या मोबाईलवर त्यांची छबी घेण्यासाठी धडपडत होता. काहीजणांनी मागील दोन पायांवर उभ्या राहणाऱ्या रेड्यांच्या अनोखी कसरती करून दाखवून उपस्थितांना आचंबित केले. शहरासह ग्रामीण परिसरातील सुमारे सातशेहून अधिक म्हशींचा या रोड शोमध्ये सहभाग होता.कोल्हापूर जिल्हा म्हैसधारक व दुग्ध व्यवसाय संघटनेच्या वतीने प्रत्येक म्हैसमालकाचा यावेळी पानविडा व नारळ देऊन सत्कार करण्यात आला. नगरसेवक उमेश पवार, विलास वास्कर, उद्योजक चंद्रकांत जाधव, संघटनेचे विलास केसरकर, विजय चौगुले, राजू करंबे, हरिभाऊ पायमल, गोगा पसारे, नंदकुमार गवळी, राजू खाडे, आदी यावेळी उपस्थित होते. पाडव्यानिमित्त गवळी गल्लीत रोड शोशनिवार पेठ येथील गवळी गल्लीत दीपावली पाडव्यानिमित्त ही गुरुवारी (दि. १२) म्हशींच्या अनोख्या सजावटीचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. रेडा उधळलाम्हशी, रेडे रोड शोदरम्यान वेगाने धावत होते. त्यामुळे त्यांना जवळून पाहण्यासाठी काही अतिउत्साही नागरिक समोरून येत होते. त्यामुळे अनेकदा रेडा उधळून मारण्यासाठी धावत होता. हा थरारक प्रकार सातत्याने अनेकदा सुरू होता. त्यामुळे अनेकांना किरकोळ जखमीही व्हावे लागले. अशी आहे प्रथा....दरवर्षी दिवाळी भाऊबीजेदिवशी म्हैसधारक आपल्या म्हशींना सजवून सम्राटनगर येथील सागरोबा देवाचे दर्शन घेऊन देवाला अभिषेक घालतात. या दर्शनानंतर वर्षभर म्हशी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकतात, अशी जुनी परंपरा आहे. त्यामुळे शहरासह उपनगरांतील म्हैसमालक आपल्या म्हशी या ठिकाणी घेऊन येतात.