शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

घरफाळा बुडविल्याचा कदम बंधूंचा आरोप खोटा;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : साळोखेनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यानिकेतनच्या घरफाळ्याबाबत आम्ही आरोप केल्यानंतरच या संस्थेने घरफाळा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : साळोखेनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यानिकेतनच्या घरफाळ्याबाबत आम्ही आरोप केल्यानंतरच या संस्थेने घरफाळा लागू करण्याबाबत हालचाली सुरू केल्याचा माजी महापौर सुनील कदम व माजी नगरसेवक सत्यजित कदम यांचा आरोप पूर्णपणे खोटा असल्याचे स्थायी समिती माजी सभापती शारंगधर देशमुख, भूपाल शेटे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. डी. वाय. पी. मॉलच्या घरफाळ्यासंदर्भात लवकरच सर्व कायदेशीर कागदपत्रे घेऊन याबाबतचे सत्य मांडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पत्रकात म्हटले आहे की, कदम बंधूंनी (काळू-बाळू अशी संभावना) डी. वाय. पाटील समूहाच्या घरफाळ्याबाबत ७ मार्च २०२१ पासून तक्रारी सुरू केल्या आहेत. पण साळोखेनगर येथील संस्थेला घरफाळा आकारणी करण्यात यावी, अशी मागणी करणारा अर्ज संस्थेने १५ ऑक्टोबर २०२० रोजी महापालिकेला पाठविला आहे. याबाबत महापालिका स्तरावर कार्यवाही सुरू आहे. महापालिकेकडून घरफाळा लागू होण्यासंदर्भात पत्र मिळताच तातडीने हा घरफाळा संस्थेकडून भरण्यात येणार आहे. या शैक्षणिक कारणासाठी आरक्षित जागेमध्ये सुरू केलेल्या शैक्षणिक संस्थांसाठी बांधकाम परवानगी घेतली असून, सध्या या ठिकाणी १६३२ विद्यार्थी शिक्षण घेत असून १३५ स्टाफ आहे. याउलट माजी खासदार धनंजय महाडिक यांचे विकासवाडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालय मात्र बंद पडले आहे. धनंजय महाडिक यांच्या तिन्ही मुलांच्या नावे असणाऱ्या मेसर्स पी. व्ही. के. एंटरप्राईजेस, कोल्हापूर या फर्मने विकासवाडी येथील इंजिनिअरिंग कॉलेजच्या मागे असलेल्या जमिनीमध्ये ७५२ ब्रास मुरूमाचे बेकायदेशीर उत्खनन केल्याबद्दल कागल तहसीलदारांनी त्यांना नोटीस बजावली आहे. त्यानुसार ३३ लाख ८ हजार रुपयांच्या दंडाची रक्कम बजावली आहे. या शैक्षणिक संकुलात बेकायदेशीर वाढीव बांधकाम केल्याबद्दल व त्याचा अनधिकृतपणे वापर सुरू असल्याबद्दल कागल नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे.