शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

भावा, फुटबॉल जिंकला पाहिजे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:36 IST

कोल्हापूर : पाच वर्षांनंतर प्रथमच पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ व शिवाजी तरुण मंडळ हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले संघ ...

कोल्हापूर : पाच वर्षांनंतर प्रथमच पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ व शिवाजी तरुण मंडळ हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले संघ राजेश चषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने आज, सोमवारी दुपारी चार वाजता विजेतेपदासाठी शाहू मैदानात एकमेकांशी भिडणार आहेत; तर मैदानाबाहेर सामन्यांत लिंबू, बाटल्या फेकाफेकी करू नये म्हणून ज्येष्ठ फुटबॉलपटूंनी सोशल मीडियावरून ‘हार-जित कोणत्याही संघाची होऊ दे; मात्र, कोल्हापूरचा फुटबॉल जिंकला पाहिजे,’ असे आवाहन केले आहे. त्यामुळे या सामन्याला भावनिक किनार मिळाली आहे.पाटाकडील तालीम मंडळाने गेल्या चार वर्षांत अपवादवगळता सर्वच स्पर्धांचे विजेतेपद पटकावत कोल्हापूरच्या फुटबॉल विश्वावर निर्विवाद वर्चस्व राखले आहे. या त्यांच्या अश्वमेघात प्रथमच शिवाजी तरुण मंडळ पाच वर्षांनंतर त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे. आतापर्यंत पाटाकडील ‘अ’ संघाने क्रीडारसिकांना वेगवान व आक्रमक खेळाचे प्रदर्शन घडविले आहे. ‘शिवाजी’चा संघही आक्रमक व चिवट असून त्यांनी यावेळी अंतिम सामन्यात मुसंडी मारली आहे. त्यामुळे आज, सोमवारी कोल्हापूरकरांना ईर्षा, चुरस आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा खेळ पाहण्यास मिळणार आहे.पाटाकडील ‘अ’च्या हृषिकेश मेथे-पाटील याने या स्पर्धेत एकूण आठ गोलची नोंद केली आहे; तर ‘शिवाजी’कडून संदीप पोवारने दोन गोलची नोंद केली आहे.आजच्या सामन्यात खिलाडूवृत्तीचा खेळ पाहण्यास मिळावा. लिंबू, बाटल्या फेकू नये व शिवीगाळ, पंचांवर अश्लील शेरेबाजी करू नये. ज्येष्ठांनी शाहू स्टेडियमवर सामना पाहण्यास येणे बंद केले आहे. त्यांनीही पुन्हा मैदानावर यावे, असे चांगले वातावरण निर्माण करूया, असे भावनिक आवाहन आजी-माजी फुटबॉलपटूंनी केले आहे.गुणसंख्या अशी‘पीटीएम ‘अ’ संघाने नऊ गुण मिळवून अव्वल ठरत अंतिम फेरीत प्रवेश केला. शिवाजी तरुण मंडळाने साखळी फेरीतून एका सामन्यात विजय, एका सामन्यात पराजय व एक सामना बरोबरीत अशा चार गुणांसह अंतिम फेरीत धडक मारली आहे.