शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘बिद्री’च्या उमेदवारीसाठी नेत्यांचीच भाऊगर्दी

By admin | Updated: October 26, 2016 22:33 IST

कार्यकर्त्यांचा होणार हिरमोड : जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघांच्या आरक्षणाचा परिणाम

निवास पाटील --सोळांकूर --बिद्री साखर कारखाना कार्यक्षेत्रात असणाऱ्या राधानगरी, भुदरगड, करवीर, कागल तालुक्यांतील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघांचे आरक्षण मनासारखे न पडल्याने दोन्ही आघाड्यांकडून इच्छुकांची गर्दी होणार, हे निश्चित. त्यामुळे कार्यकर्ते जरी जोमात असले तरी नेतेच ‘बिद्री’च्या प्रेमात पडण्याची शक्यता अधिक आहे. अनेक वर्षे सत्तेच्या आशेपोटी धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांना नेते बळ देणार की, कार्यकर्ते नेत्यांना पाठबळ देणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.बिद्री साखर कारखान्याच्या वाढीव सभासद संस्था न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणूक लांबणीवर पडली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, तसेच साखर कारखान्याची निवडणूक एकाच महिन्यात होण्याची शक्यता आहे. बिद्री साखर कारखाना चारही तालुक्यांतील मोठी संस्था आहे. आपली वर्णी संचालक पदावर लागावी म्हणून अनेकजण देव पाण्यात घालून बसले आहेत. सत्ताधारी व विरोधी दोन्हीही आघाड्यांतील प्रमुख नेत्यांनी इच्छुकांची गर्दी कमी करण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचे आमिष दाखविण्यात आले होते. आरक्षणापूर्वी अनेकांनी छुपा प्रचार सुरू केला होता; पण मनासारखे आरक्षण न पडल्याने मतदारसंघातील इच्छुक गायब झाले आहेत.कार्यक्षेत्रातील तालुक्याचे राजकारण पैशापेक्षा गटा-तटावर अवलंबून आहे. एकीकडे काही गटातील प्रमुख नेत्यांकडे कोणतेही महत्त्वाचे पद नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना हवे असणारे जि. प. व पं. स. मतदारसंघाचे आरक्षण पडले नसल्याने त्यांनाही कारखान्याच्या संचालकपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. आपली वर्णी लागावी म्हणून कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, गटाच्या प्रमुख नेत्यांकडेच महत्त्वाचे पद नसल्याने नेत्यांकडे बळ मागायचे की नेत्यांना पाठबळ देऊन सत्तेत आणायच,े अशी विचारधारा पुढे येत आहे.बिद्रीचे पॅनेल हे अवघ्या काही वेळात ठरते. नेमकी नेत्यांना की कार्यकर्त्यांना संधी मिळणार, हे निवडणुकीवेळीच ठरणार हे मात्र निश्चित.बिद्री कारखान्यात सत्ताधारी असणाऱ्या व विरोधी गटातही प्रमुख असणारे नेते यांना कोणतेच सत्तेचे पद नसल्याने, तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण मनासारखे न पडल्याने बिद्री कारखान्यातील संचालक पदाशिवाय पर्याय नसल्याचे चित्र दिसत आहे. अनेक गटांच्या नेत्यांकडे कोणतेही महत्त्वाचे पद नसल्याने चारही तालुक्यांतील गटांच्या नेत्यांची चांगलीच गोची होणार आहे. बिद्री कारखान्यावर आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही आघाड्यांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.विरोधकांनी कडकडून विरोध केला असताना महत्त्वाकांक्षी सहवीज प्रकल्प व कारखाना कर्जमुक्तीकडे आहे. उच्चांकी ऊसदर, साखर उतारा, वाढीव सभासद, लोकाभिमुख कारभारामुळे या कारखान्याची सत्ता पुन्हा आपल्याकडे देतील, असा दावा सत्ताधारी मंडळी करीत आहेत. तर भ्रष्ट कारभार, बोगस सभासद, कारखान्यातील मनमानी कारभार यामुळे कारखान्याची सत्ता आपल्याकडे देतील, असा विश्वास विरोधी मंडळी व्यक्त करीत आहेत. दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.