शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

ब्रिटिशकालीन इमारत जीर्ण

By admin | Updated: July 31, 2014 23:21 IST

कागल पोलीस ठाणे : जागा, निधी मंजूर होऊनही इमारतीची प्रतीक्षा कायम

जहाँगीर शेख- कागलकागल पोलीस ठाण्याच्या संशयित आरोपी ठेवण्याच्या लॉकअप गार्डची इमारत जीर्ण अवस्थेत आली आहे. जुन्या काळातील पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीसाठी जयसिंगराव पार्कात जागा आणि निधी मंजुरीची घोषणा होऊन हा विषय प्रलंबितच राहिला आहे. चार दिवसांपूर्वी या लॉकअप गार्डमधून आरोपी दिवसाढवळ्या पळून जाण्याच्या प्रकाराने कागल पोलीस ठाण्याच्या इमारतीचा मुद्दा पुन्हा एकदा एैरणीवर आला आहे.कागल हे संस्थानकालीन शहर असल्याने येथे ब्रिटिशकाळापासून असणाऱ्या पोलीस ठाण्याच्या इमारतीतच स्वातंत्र्यानंतरही पोलीस ठाणे सुरू राहिले.पोलीस ठाण्याची ही दगडी इमारत भक्कम आहे; पण छप्पर कमकुवत झाले आहे. जागाही अपुरी पडत आहे, तर संशयित आरोपी न्यायालयीन आणि पोलीस कोठडीच्या काळात तसेच अटक करून न्यायालयात हजर करण्यापूर्वीच्या काळात ठेवण्यासाठी जे लॉकअप गार्ड किंवा कारागृह आहे तेही ब्रिटिशकालखंडातील आहे. ही इमारत म्हणजे तत्कालीन घाटगे संस्थानिकांच्या राजवाड्याबाहेरील घोड्याची पाग होती. याच राजवाड्यातील तहसील कार्यालय काही वर्षांपूर्वी प्रशासकीय इमारतीत हलविण्यात आले; मात्र पोलीस ठाण्याचे हे लॉकअप अजून आहे तिथेच आहे.इमारत दुरुस्ती करता येत नाही. कारण नवी इमारत जयसिंगराव पार्कातील फौजदार बंगला येथे बांधण्याचे निश्चित झाले आहे. शासनाकडून मंजुरीही मिळालेली आहे. त्यामुळे हे लॉकअप गार्ड म्हणजे पोलिसांसाठी धोकादायक ठिकाण बनलेले आहे. कपिल सातवेकर या संशयित आरोपीने हातात बेड्या असताना केवळ दरवाजाला हिसडा मारून कडी कोयंड्याची बिजागिरी निखळली. ही अवस्था दरवाजांची, तर इमारतीच्या छताचा भाग कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहे. याच इमारतीच्या जवळील तहसील कार्यालयाच्या दर्शनी असणाऱ्या इमारतीचे छत या पावसाळ्यात कोसळले आहे. एकूणच हे कागलचे लॉकअप गार्ड पोलिसांच्या बरोबरच कैद्यांसाठीही धोक्याचे ठिकाण बनले आहे.