शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आंदोलकांकडे कोणतीही परवानगी नाही, दुपारी ३ पर्यंत जागा रिकामी करा: मुंबई हायकोर्ट
2
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
3
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
4
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
5
"लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले?
6
पीटर नवारोंनी पुन्हा गरळ ओकली, मोदी-पुतिन-जिनपिंग यांच्या भेटीवर केले मोठे विधान
7
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
8
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला...
9
काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार
10
बनावट पासपोर्ट वापरल्यास कठोर शिक्षा; नवीन स्थलांतर व परदेशी नागरिक कायदा लागू
11
"भारतानं रोखलं आमचं SCO सदस्यत्व!"; मुस्लीम देश भडकला; म्हणाला, 'पाकिस्तान...'
12
Ganesh Festival 2025: 'घालीन लोटांगण' सुरू होताच स्वत:भोवती प्रदक्षिणा घालता का? थांबा, तुम्ही चुकताय
13
Lalbaugcha Raja: लालबागचा राजा मंडळाला मानवी हक्क आयोगाची नोटीस; ‘व्हीआयपी’ दर्शनाबाबत तक्रार!
14
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
15
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
16
४ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: तुळशीचा १ उपाय करा, पूर्ण पुण्य मिळवा; श्रीविष्णू कृपा करतील
17
MI च्या ताफ्यातून स्टार झालेल्या पोलार्डची शाहरुखच्या संघाकडून 'हिरोगिरी'! ८ चेंडूत ७ गगनचुंबी षटकार (VIDEO)
18
शिक्षकांना नोकरीत टिकून राहण्यासाठी टीईटी देणे अनिवार्य, राज्यांच्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल
19
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
20
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?

ब्रिटिशांनाही होते कुतूहल जोतिबाच्या यात्रेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 23:48 IST

मुरलीधर कुलकर्णी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : चैत्र महिन्यात होणाऱ्या जोतिबाच्या यात्रेचे भारतीयांइतकेच ब्रिटिशांनाही कुतूहल होते. लाखोंच्या संख्येने ...

मुरलीधर कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : चैत्र महिन्यात होणाऱ्या जोतिबाच्या यात्रेचे भारतीयांइतकेच ब्रिटिशांनाही कुतूहल होते. लाखोंच्या संख्येने येणाºया भाविकांची व्यवस्था नेमकी कशी केली जाते, याबद्दल त्यांना उत्सुकता होती. या संबंधीची एक बातमी इंग्लंडमधून प्रसिद्ध होणाºया होमवर्ड मेल या वृत्तपत्रात ८ जून १८६८ रोजी छापून आली होती, अशी माहिती यशोधन जोशी यांनी दिली. जोशी हे एल अँड टी कंपनी, पुणे येथे प्रोजेक्ट मॅनेजर पदावर कार्यरत असून, मूळचे कोल्हापुरातील सानेगुरुजी वसाहत येथील रहिवासी आहेत.इतिहासाचे अभ्यासक असलेले जोशी हे ब्रिटिश अर्काइव्हमध्ये कोल्हापूरसंबंधी माहिती शोधत असताना त्यांना ही बातमी सापडली. या बातमीमध्ये त्या काळात झालेल्या जोतिबाच्या यात्रेची दिलेली माहिती मोठी रंजक आहे. वाहनांची सोय नसल्याने यात्रेकरू तसेच नारळ, गुलाल या मालांची वाहतूक प्रामुख्याने बैलगाडीने व्हायची. यात्रेच्या काळात काढल्या जाणाºया मिरवणुकीसाठी हत्ती, घोडे, उंट यांचा वापर केला जायचा. तसेच जोतिबा डोंगरावर येणाºया यात्रेकरूंसाठी अन्नछत्रही चालायचे, अशी माहिती या बातमीत देण्यात आली आहे. १८५४ सालच्या मेजर ग्रॅॅहमच्या एका रिपोर्टनुसार जोतिबा संस्थानचे त्यावेळचे वार्षिक उत्पन्न अंदाजे १२ हजार रुपये असल्याचा उल्लेखही या बातमीत आहे. शेकडो बैलगाड्यातून नारळ तसेच गुलाल यात्रेसाठी आणला जात असल्याचा उल्लेखही या बातमीत आढळतो.यात्रा काळात जमादाराचा खूनयात्रेसाठी बंदोबस्त ठेवण्याची जबाबदारी त्याकाळी ब्रिटिश सरकारची होती. त्यांचे पोलिस बंदोबस्तासाठी असायचे. दर्शनासाठी येणाºया भाविकांकडून चिरीमिरी घेऊन त्यांना लवकर सोडण्याचे प्रकारही चालायचे. या गोष्टीची तक्रार झाल्याने एक जमादार तपासणीसाठी आला असता त्यांना एक हवालदार लाच घेताना रंगेहात सापडला. त्या हवालदाराचा ब्रिटिश सरकारच्या जमादाराने सर्वासमक्ष चांगलाच पाणउतारा केला; पण हे करीत असताना जमादाराने उच्चारलेले काही शब्द हवालदाराच्या जिव्हारी लागले. त्यामुळे संतापलेल्या हवालदाराने त्या जमादाराचा तंबूत घुसून गोळी झाडून खून केला होता. नंतर त्या हवालदाराला ब्रिटिश पोलिसांनी अटक केल्याचाही उल्लेख या बातमीत आहे.