शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

श्रेय लाटणाऱ्या महाडिकांना घरी बसवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2017 01:08 IST

सुजित मिणचेकर : शिरोलीत शाहू-स्वाभिमानी आघाडीची प्रचारसभा

शिरोली : शासनाच्या योजना आणि स्थानिक आमदार निधीतून झालेल्या कामाचे श्रेय लाटण्याचे काम महाडिक आणि कंपनी करीत आहे. दुसऱ्याचे श्रेय लाटणाऱ्या महाडिकांना या निवडणुकीत घरी बसवा, असे आवाहन आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी केले. शिरोलीतील बिरदेव मंदिर येथे शाहू-स्वाभिमानी आघाडीच्या प्रचार प्रारंभी आयोजित समारंभात ते बोलत होते.यावेळी आमदार मिणचेकर म्हणाले, शासनाच्या विविध योजनांमुळे ग्रामपंचायतीला थेट निधी मिळू लागला आहे. या कामाचे श्रेय आमदार, जिल्हा परिषद सदस्यांनी घेऊ नये. त्यांच्या विकासकामांच्या यादीत आमदार, खासदार व शासकीय योजनांसह मी केलेल्या विकासकामांचाही समावेश आहे. हद्दवाढ आंदोलनात शिरोली गाव दहा दिवस बंद ठेवून महामार्गावर उतरले होते. त्यावेळी भाजपचे आमदार पोलिस केस होईल या भीतीने रस्त्यावर उरले नाहीत. तर जिल्हा परिषद सदस्य या आंदोलनाकडे फिरकले सुद्धा नाहीत. अशा जिल्हा परिषद सदस्यांना सूज्ञ मतदार घरीच बसविणार आहेत.वारणा साखर कारखान्याचे संचालक सुभाष पाटील म्हणाले, पाच वर्षांपूर्वी आम्हाला दिलेली कोणतीच आश्वासने महाडिकांनी पूर्ण केली नाहीत. म्हणूनच या निवडणुकीत महाडिक यांच्या विरोधात बंड पुकारले आहे. सर्वसामान्य जनता स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार रूपाली अनिल खवरे, सुधीर सुभाष पाटील, सुमन प्रल्हाद खोत यांच्या पाठीशी उभे राहील.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, महेश चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सुरेश यादव, जिल्हा परिषदेचे उमेदवार रूपाली खवरे, पंचायत समितीचे उमेदवार सुधीर पाटील आणि सुमन खोत, संभापूरचे माजी सरपंच प्रकाश झिरंगे, अभिनंदन सोळांकुरे, एम. बी. पाटील, सतीश चौगुले यांची भाषणे झाली.यावेळी महावीर पाटील, गणपती माळी, विजय पोवार, अनिल खवरे, तासगावचे संपत पाटील, प्रल्हाद खवरे, दीपक यादव यांच्यासह नागरिक उपस्थित होते.विरोधकांचा पराभव निश्चितविधान परिषदेच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी महाडिकांचा पराभव केला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीतही नागावचे बंटी पाटील पुन्हा महाडिकांना पराभूत करतील. त्यामुळे या निवडणुकीत बंटींच्या विरोधकांचा पराभव निश्चित आहे, असे आमदार मिणचेकर म्हणाले.