शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

बिद्रीत राष्ट्रवादीची विजयी घोडदौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 15:19 IST

कोल्हापूर, दि. १0 : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मोजणी सुरु झाली असून सलामीलाच राष्ट्रवादी - भाजपच्या आघाडीने राखीव गटातील तीन जागा जिंकल्या आहेत.राष्ट्रवादी भाजप आघाडीचे संस्था गटातील उमेदवार जगदीश पाटील यांचा ५२ मताने विजयी झाल्याचा पहिला निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु ...

ठळक मुद्दे राखीव गटातील तीन जागा जिंकल्या राष्ट्रवादी-भाजप आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

कोल्हापूर, दि. १0 : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मोजणी सुरु झाली असून सलामीलाच राष्ट्रवादी - भाजपच्या आघाडीने राखीव गटातील तीन जागा जिंकल्या आहेत.राष्ट्रवादी भाजप आघाडीचे संस्था गटातील उमेदवार जगदीश पाटील यांचा ५२ मताने विजयी झाल्याचा पहिला निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला.दुपारपर्यंत लागलेल्या निकालातून या आघाडीची घोडदौड सुरूच असून दोन जागा जिंकल्यानंतर इतर मागास प्रवगार्तून युवराज वारके हे ४८८३ मतांनी विजयी झाले आहेत. युवराज वारके यांना २५८०१ मते मिळाली. तर शिवसेना--कॉग्रेस आघाडीच्या बाजीराव गोधडे यांना २०९१८ मते मिळाली. ६०२ मते अवैध ठरली.राष्ट्रवादी-भाजप आघडीतील कुरुपलीच्या अर्चना पाटील, निढोरीच्या निता राणे, वाळवे खुर्दचे जगदीश पाटील विजयी झाले आहेत. भाजप-राष्ट्रवादीने आपली विजयाची घोडदौड सुरुच ठेवली आहे. युवराज वारके हे मागास प्रवगार्तील उमेदवार आहेत.या निवडणुकीत राष्ट्रवादी - भाजपच्या आघाडीने पहिली जागा जिंकल्यानंतर गट क्र. ६ 'अनुसूचित जमाती'मधून याच आघाडीच्या प्रदीप शिवाजी पाटील यांनी शिवसेना-कॉंग्रेसच्या श्यामराव भोई यांच्यावर ४००८ मतांनी विजय मिळविला. पाटील यांना २५३३४ तर भोई यांना २१३२६ मते मिळाली. ६६४ मते अवैध ठरली. सलग तिसरी जागा जिंकत राष्ट्रवादी - भाजप आघाडीने वर्चस्व राखले आहे.

अत्यंत चुरशीच्या बिद्री कारखान्याच्या निवडणुकीचा निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. सकाळी आठ वाजल्यापासून लोणार वसाहत येथील रामकृष्ण हॉलमध्ये मतमोजणीस सुरुवात झाली. निकाल ऐकण्यासाठी दोन्हीकडील कार्यकर्त्यांची मतमोजणी परिसरात प्रचंड गर्दी आहे.