जयसिंगपूर : येथील दुर्गा सहेलीच्यावतीने गरीब व गरजूंना जेवण व मास्कचे वाटप केले. या सामाजिक बांधिलकीमुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. या उपक्रमात डॉ. स्नेहल कुलकर्णी, वीणा चव्हाण, स्वाती बस्तवाडे, श्रीदेवी नकाते, वैशाली कावरे, नलिनी देसाई, संगीता जाधव, अनुराधा वेल्हाळ, अश्विनी नरुटे, अरुणा गुंडे यांच्यासह सदस्यांनी सहभाग घेतला होता.
यड्रावमध्ये औषध फवारणी
यड्राव : डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशन व शंख फाउंडेशन यांच्यावतीने येथील पार्वती हौसिंग सोसायटी, प्रियदर्शनी कॉलनी, कुंभोजे मळा, गोमटेश कॉलनी, पार्श्वनाथनगर व आर. के. नगर, पडियार वसाहत या परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औषध फवारणी करण्यात आले. यावेळी जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी सरपंच कृणालसिंह नाईक-निंबाळकर, भरत लड्डा, महावीर पाटील, लक्ष्मीकांत लड्डा, महेश कुंभार, बाबासोा राजमाने, रोहित कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यड्रावमध्ये लसीची प्रतीक्षा
यड्राव : यड्राव (ता. शिरोळ) येथे लसीचा तुटवडा जाणवत आहे. गावामध्ये चार दिवसांतून वीस डोस उपलब्ध होत असल्याने नागरिक लसीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर लस उपलब्ध करावी, अशी मागणी होत आहे.