शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

संक्षिप्त क्राईम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:49 IST

इचलकरंजी : जवाहरनगर येथील परिसरात केवळ आपले वर्चस्व व दहशत राहावी, या कारणातून दोघांनी एका युवकाला दगडाने बेदम मारहाण ...

इचलकरंजी : जवाहरनगर येथील परिसरात केवळ आपले वर्चस्व व दहशत राहावी, या कारणातून दोघांनी एका युवकाला दगडाने बेदम मारहाण केली. प्रमोद बाळू भिसे (वय २४, रा. मरगूबाई मंदिरसमोर, जवाहरनगर) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी अजित सलगर व यासीन हटेली (पूर्ण नाव समजू शकले नाही) यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि.१५) रात्री घडली.

.............

मोटारसायकल अपघात

इचलकरंजी : सांगली नाका परिसरात दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघात एकजण जखमी झाला. महंमद असीम शेख (वय ५०, रा. कळे, ता. कराड) असे त्याचे नाव आहे. त्यातील दुसरा मोटारसायकलस्वार घटनास्थळावरून मोटारसायकल सोडून पसार झाला आहे. याबाबत त्याच्या मोटारसायकल क्रमांकावरून गावभाग पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

....................

चोरट्या महिलेस अटक

इचलकरंजी : दिवसा घरात चोरी करणाऱ्या एका महिलेस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. सुप्रभा दत्तात्रय महाडिक (वय ७०, रा. पुलाची शिरोली) असे तिचे नाव आहे. तिच्याकडून चांदीचे ग्लास, निरंजन, तीन लहान वाट्या, घंटी, अगरबत्ती स्टॅण्ड असा सुमारे दहा हजार ९७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तिने कागवाडे मळ्यातील पंचरत्न अपार्टमेंटमध्ये चोरी केल्याचे कबूल केले आहे. या चोरीची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.