शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
2
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
3
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
4
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
5
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
6
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
7
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
8
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
9
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
10
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
11
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
12
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
13
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
14
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
15
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
16
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?
17
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
18
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
19
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
20
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश

पुलाचे तीन पिलर कोसळले

By admin | Updated: December 25, 2014 00:08 IST

मुरगूड-कुरणी पूल धोकादायक : पाटबंधारे खात्याचे पूर्णपणे दुर्लक्षित

अनिल पाटील- मुरगूड शहरातून कागल कुरणी भडगाव, मळगे, आदी गावांकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून मोठ्या प्रमाणात वापर होत असलेल्या मुरगूड कुरणी रस्त्यावरील वेदगंगा नदीवर असणाऱ्या पुलाचे तीन पिलर ढासळल्याने या पुलावरून होणारी वाहतूक पूर्णपणे धोकादायक बनली असून, गेले कित्येक वर्षांपासून पाटबंधारे खात्याने याकडे दुर्लक्ष केले आहे.निपणी कणकवली राज्यमार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. या रस्त्यावरील वाहनांना कागलकडे जायचे असल्यास वाहनधारक सर्रास या मार्गाचाच वापर करतात तसेच कुरणी, चौंडाळ, सावर्डे, भडगाव, मळग,े आदी दहा ते पंधरा गावातील हजारो ग्रामस्थ विद्यार्थी दररोज याच पुलावरून सायकल, मोटारसायकल, चारचाकी कारद्वारे ये-जा करीत असतात. तसेच साखर कारखाने सुरू झालेल्या काळात काही उसाने भरलेले ट्रॅक्टर्स याच पुलावरून ये-जा करतात. वेदगंगा नदीवर असणारा पूल वजा बंधारा हा पाटबंधारे खात्याच्या अखत्यारित आहे. या बंधाऱ्याला १०० वर्षे झाली आहेत; पण किरकोळ दुरुस्ती वगळता याकडे पाटबंधारे खात्याने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. दोन वर्षांपूर्वी पुलाचे पूर्वेकडील बाजूला असणारे कुरणी गावाकडील बाजूचे सलगचे तीन पिलर कोसळले आहेत. हे पिलर्स अर्ध्याहून खाली कोसळलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे या संपूर्ण पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. उन्हाळ्यात या अवस्थेतच त्याठिकाणी बरगे घातले जातात; पण त्यातूनही प्रचंड वेगाच्या दाबाने पाणी वाहते. पुलावरील रस्ता तर अक्षरश: खड्ड्यांची चाळण झाली आहे. काही ठिकाणी अर्धाएक फुटांपर्यंत खोल खड्डे पडले आहेत. याबाबत विचारणा झाल्यास पाटबंधारे खात्याकडून जुजबी उपाय केले जातात. मुरूम टाकून पुलावरील खड्डे मुजविण्याचा केविलवाणा प्रयत्नही केला आहे.पुलाचा पिलर ढासळण्यास सुरुवात झाली त्यावेळी पुलाच्या दोन्ही बाजूला खात्याकडून हा पूल ‘अवजड वाहतुकीस धोकादायक’, असे दोन बोर्ड लावले गेले आहेत; पण गेल्या दोन वर्षांत पाटबंधारे खात्याने या पुलाच्या दुरुस्तीकडे लक्ष दिलेले नाही, याबाबत वाहनधारकांतूक संताप व्यक्त होत आहे.