शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

साळवण येथील नदीवरील पुलाची दुरवस्था

By admin | Updated: January 8, 2015 00:03 IST

बांधकाम खात्याचे दुर्लक्ष : तत्काळ डागडुजी करण्याची मागणी

साळवण : साळवण  - (ता. गगनबावडा) येथील सरस्वती पुलाची दुरवस्था झाली असून, डागडुजीकडे दुर्लक्ष केल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.गगनबावडा-कोल्हापूर राज्य मार्गावर साळवण येथे सरस्वती नदीवर १९५८ मध्ये पुलाचे बांधकाम झाले आहे. यापूर्वी कोल्हापूरहून साळवणपर्यंत व गगनबावड्याहून साळवणपर्यंत एस.टी. येत असे. प्रवाशांना होडीतून पलीकडे जाऊन एस.टी.चा प्रवास करावा लागत होता. पुलाची लांबी ५३ मीटर आहे. प्रत्येकी १७ मीटर अंतरावर असे एकूण तीन गाळे आहेत. या पुलामुळे कोकणात जाणारा नजीकचा मार्ग म्हणून या मार्गाचा वापर वाहनधारक करतात. या मार्गामुळे वेळ आणि इंधनाची मोठ्या प्रमाणावर बचत होते. या मार्गावर मोठी वाहतूक सुरू आहे.५७ वर्षे पूर्ण झालेल्या पुलाची मात्र दुरवस्था होऊ लागली आहे. साळवणकडील बाजूला मुख्य नदी प्रवाहावरच चार ते पाच फूट लांबी-रुंदीचा कठ्ठा तुटला आहे, तर पोलीस चौकीकडील बाजूच्या संरक्षक कठड्याचे दगड निखळले आहेत. दोन्ही बाजूच्या संरक्षक कठड्याचे प्लॅस्टर उखडले आहे. मुख्य पुलाच्या दोन्ही बाजूला सुमारे पंधरा ते वीस फूट अंतरात सिमेंटचे खांब व त्यातून लोखंडी पाईप असून, या सर्व लोखंडी पाईप गंजून गेल्या आहेत. पाईप तुटून जमिनीवर पडल्या आहेत. परिसरातील साखर कारखाने सुरू झाल्यामुळे वाहतुकीत भर पडली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित पडझडीची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)