शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

मटक्यातील २५ कोटींच्या उलाढालीला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:35 IST

एकनाथ पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील मटका-जुगाराचे कनेक्शन चालविणाऱ्या राकेश मदनलाल अग्रवाल (वय ४६, रा. ...

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील मटका-जुगाराचे कनेक्शन चालविणाऱ्या राकेश मदनलाल अग्रवाल (वय ४६, रा. मथुरानगर, सांगली नाका, इचलकरंजी), विजय लहू पाटील (४९, रा. देवकर पाणंद, कोल्हापूर), सम्राट सुभाष कोराणे (३८, रा. शिवाजी पेठ) यांच्यावर पहिल्यांदाच पोलिसांनी कठोर कारवाई केली. या कारवाईचा परिणाम म्हणून कोल्हापूरसह सांगली, सातारा, बेळगाव या चार जिल्ह्यांतील रोजच्या २५ कोटींच्या उलाढालीला ब्रेक लागल्याची माहिती खुद्द पोलीसच देत आहेत.पश्चिम महाराष्ट्राचे मटका-जुगाराचे केंद्र म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, पुणे ग्रामीण, बेळगाव या सहा जिल्ह्यांतील मटका-जुगाराचे म्होरके अग्रवाल, कोराणे आणि विजय पाटील आहेत. त्यांचे नेटवर्क सांभाळण्यासाठी एक हजारच्या आसपास एजंटांचे जाळे विखुरलेले आहे. आतापर्यंत पोलिसांनी या तिघा म्होरक्यांवर कठोर कारवाईचा बडगा उचललाच नव्हता. त्यांच्या खालच्या एजंटांवरच कारवाई केली जात होती. यापूर्वी विजय पाटील आणि कोराणे यांच्यावर कारवाई जरी झाली असली तरी ती जुजबी होती. ओसवाल हा दिसायला साधा असला तरी त्याचे थेट मुंबईतून मटक्याचे कनेक्शन आहे. त्याची एकट्याची दिवसाची उलाढाल १० कोटी असल्याचे पोलीस सांगत आहेत.मोबाईल, व्हॉट्सअ‍ॅपवरून मटकाजिल्ह्यातील पानटपरी, गल्ली-बोळांत खुलेआम सुरू असलेले मटका, जुगार अड्डे आणि पिवळ्या-पांढºया चिठ्ठ्या बंद करून मोबाईल, एसएमएस व व्हॉट्सअ‍ॅपवरून मटका घेण्याची नवी पद्धत मटकाधारकांनी अवलंबली आहे. नुकतीच जुना राजवाडा पोलिसांनी विजय पाटील याच्यावर कारवाई केली.गुन्हेगार एजंटविजय पाटील याने राकेश ओसवाल, सम्राट कोराणे यांच्याशी हातमिळवणी करून या तिघांनी ‘झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग’ अशी जाहिरात करून पश्चिम महाराष्ट्रात जोमाने मटका पसरवला. गुन्हेगारीशी संबंधित तरुणांना त्यांनी आपले एजंट बनविले आहे. या मटक्यातून तिघांनी करोडो रुपयांची माया जमविली आहे.कारवाईचे कौतुकजिल्ह्यातून मटका व जुगार हद्दपार करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कठोर पाऊल उचलले आहे. त्यांच्या या कारवाईचे नागरिकांतून कौतुक होत आहे.