शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसांत भिंत पाडा, अन्यथा मी पाडेन : राणे

By admin | Updated: December 29, 2014 23:36 IST

प्रशासनाला इशारा : आरोंदा जेटीला काँॅग्रेसचा विरोधच

सावंतवाडी : आरोंदा जेटीला काँॅग्रेसचा तीव्र विरोध आहे. हा विरोध डावलून कोण काम करीत असेल तर शांत राहू नका, असे कार्यकर्त्यांना सुनावत येत्या दहा दिवसांत जेटीची भिंत प्रशासनाने न काढल्यास मी स्वत: ती भिंत हटविण्यासाठी आरोंदा येथे जाईन. पुढची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची राहील, असा स्पष्ट इशारा माजी मुख्यमंत्री तथा काँॅग्रेस नेते नारायण राणे यांनी दिला आहे. सावंतवाडी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी माजी खासदार नीलेश राणे, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, तालुकाध्यक्ष संजू परब, डॉ. जयेंद्र परुळेकर, राजू मसूरकर, संदीप कुडतरकर, सभापती प्रमोद सावंत, प्रमोद गावडे, प्रियांका गावडे उपस्थित होते.यावेळी राणे म्हणाले, राज्यमंत्र्याला किती अधिकार असतात हे त्यांनी अगोदर पाहावे. राज्यमंत्री अधिकाऱ्यालाही आदेश देऊ शकत नाही. मात्र, आताचे पालकमंत्री गटविकास अधिकारी आणि सहायक जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठका घेतात आणि जेवणावळी वाढतात. या जेवणावळीचा खर्च तसेच हारतुऱ्यांचा खर्च हा ठेकेदाराच्या खिशातून होत असून याची चौकशी झाली पाहिजे. या सर्व ठेकेदारांची यादी माझ्याकडे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.आरोंदा जेटीवरून आमच्या माणसांवर कोणी कितीही गुन्हे दाखल करू दे अगर धमक्या देऊ दे, आरोंदावासीयांच्या मागे मी ठामपणे उभा आहे. काम करणारे किती दिवस पोलीस संरक्षण घेतात, हेच पाहायचे आहे, असे सांगत दोन टक्क्यांवर दलाली करणाऱ्यांकडून काय अपेक्षा ठेवायची, असा सवालही राणे यांनी केला. (प्रतिनिधी)देसाई यांच्यावर टीकानारायण राणे यांनी यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावरही जोरदार टीका केली. मी या जिल्ह्यातीलच आहे. उपरा नाही, त्यामुळे मी मालकच असून, पालकमंत्र्यांनी हे उपऱ्यांना सांगावे, मला नाही. देसाई यांनी प्रथम उद्योग विभागाचा अभ्यास करावा आणि नंतर बोलावे. विमानतळ करतानाच रस्ते करायचे का, असे विचारणाऱ्यांचे किती हे अज्ञान, असे सांगत पुन्हा माझ्यावर टीका केल्यास उसन्या दाताच्या कवळ्या माघारी जाणार नाहीत, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.