शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

बँकेतील भ्रष्ट कारभार मोडून काढणार

By admin | Updated: March 19, 2015 00:01 IST

विश्वासराव माने : मूठभर संचालकांमुळे बँक बनलीय गुंडांचा अड्डा

भारत चव्हाण - कोल्हापूर अनावश्यक खरेदी, वारेमाप खर्च, बोगस बिले सादर करून प्रवास भत्ते उचलणे यासारखे अनेक प्रकार राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट बॅँकेत घडत असून, हा भ्रष्ट कारभार मोडून काढून तेथे स्वच्छ व पारदर्शी कारभार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही राजर्षी शाहू आदर्श पॅनेलचे प्रमुख व बँकेचे विद्यमान संचालक विश्वासराव माने यांनी बॅँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ‘लोकमत’कडे आपली भूमिका मांडताना दिली. मूठभर संचालकांमुळे बॅँक ही गुंडांचा अड्डा बनला असून, राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला लागलेला हा कलंक पुसून टाकण्यात सभासद पुढाकार घेतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. गुंडगिरी, दहशत निर्माण करून तसेच प्रसंगी विरोधी भूमिका घेणाऱ्या संचालकांवर दबाव टाकून, धमक्या देऊन बॅँक आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न रवींद्र पंदारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे, असा आरोप विश्वासराव माने यांनी केला. गैरकारभाराची माहिती देताना माने यांनी सांगितले की, सत्तारूढ पंदारे गटाने गेल्या पाच वर्षांत संस्थेच्या पैशांची वारेमाप उधळपट्टी केली आहे. एक कोटींची ठेव ठेवून घेताना ३१ मार्चला एक धनादेश स्वीकारला; परंतु हा धनादेश प्रत्यक्षात २४ एप्रिलला वठला. त्यामुळे बँकेला नुकसान झाले. माजी अध्यक्ष चंद्रकांत घाटगे यांनी ३५ हजारांची खोटी बिले सादर करून प्रवास भत्ते उचलले आहेत. संचालक मंडळाने नको त्या कारणांसाठी खरेदी करून वारेमाप पैसे खर्च केले आहेत. पंदारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गैरकारभार करून बॅँकेचे नाव खराब केले आहे.रवींद्र पंदारे व शशिकांत तिवले हे सभेचे खोटे इतिवृत्तांत लिहिण्यात पटाईत आहेत. यासंदर्भात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन निकाल त्यांच्या विरोधात गेला आहे, त्यावरूनच त्यांच्या भ्रष्ट कारभाराची प्रचिती येते, असे सांगून माने म्हणाले की, ‘संगणक, स्टेशनरीवर किती खर्च केला याची माहिती मागूनही दिली जात नाही. आपल्या मर्जीतील सहा कर्मचाऱ्यांची बेकायदेशीर भरती करून त्यांना वेतनवाढीही दिल्या आहेत. संचालकाच्या एका मेहुण्याची गाडी भाड्याने घेतली आहे. या गाडी वापरावर किती खर्च केला याची माहिती दिली जात नाही.’संचालकाला घातले कोंडून माने यांनी सांगितले की, ज्येष्ठ संचालक रंगराव आळवेकर यांनी २०११ मध्ये विद्यमान संचालकांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे पंदारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी संचालक मंडळाच्या बैठकीवेळी आळवेकरांना कोंडून घालून, धमकावून राजीनामा लिहून घेतला. बँकेत भ्रष्ट कारभार करणाऱ्यांना राज्यकर्त्यांचे सहकार्य मिळाले. त्यांच्या विरोधात लढताना मर्यादा येत होत्या. आता सभासदच अशा लोकांना बाहेर काढतील.‘गव्हर्न्मेंट सर्व्हंट बॅँक निवडणूक’‘माझी भूमिका’