शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांच्या गावांत मतदानासाठी चढाओढ

By admin | Updated: April 24, 2017 01:14 IST

भोगावती साखर कारखाना निवडणूक : सकाळी उत्साह; दुपारी मतदान केंद्रांवर नीरव शांतता

कोल्हापूर : भोगावती साखर कारखान्याच्या मतदानासाठी सकाळी उत्साह दिसत होता, पण दुपारी बारानंतर सर्वच केंद्रांवर अक्षरश: नीरव शांतता पसरली होती. दुपारनंतर वयोवृद्ध, आजारी व परगावाचे मतदान आणण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ पाहायला मिळाली. सकाळी लवकर मतदान करून शेतात जाण्याची धांदल सर्वच गावांत पाहावयास मिळाली. त्यामुळे सकाळी दहापर्यंत काही अपवाद वगळता बहुतांशी केंद्रांवर गर्दी दिसत होती. पहिल्या दोन तासांत ४० टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. दुपारी बारानंतर उन्हाचा तडाखा वाढू लागला तशी मतदान केंद्रे ओस पडू लागली. दुपारी दोनपर्यंत सर्वच केंद्रांवर अक्षरश: निरव शांतता होती. दुपारनंतर राहिलेल्या मतदारांचा शोध कार्यकर्त्यांनी सुरू केला होता. कोणाचे मतदान राहिले, त्याचा पाठलाग करून मतदान करण्यासाठी धडपड सुरू होती. त्यासाठी प्रत्येक आघाडीने स्वतंत्र यंत्रणा उभी केली होती. ज्या गावात उमेदवार आहे, तिथे ही यंत्रणा अधिक गतीने काम करताना दिसत होती. सडोली खालसा, वाशी, हसूर, राशिवडे, कौलव, घोटवडे, ठिकपुर्ली येथे मतदानात कमालीची चुरस पाहावयास मिळाली. ज्या गावात कोणत्याही आघाडीचा उमेदवार नाही, तेथील वातावरण हलके-फुलके दिसत होते. तिन्ही आघाडीचे कार्यकर्ते एकत्रित गप्पा मारत मतदारांच्या प्रतीक्षेत बसलेले दिसत होते. भोगावती येथे बिगर उत्पादक गटातील मतदान झाले. संस्था प्रतिनिधींचे मर्यादित मतदान असल्याने ही प्रक्रिया वेगाने पूर्ण झाली. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी आमदार संपतराव पवार, कृष्णराव किरुळकर, धैर्यशील पाटील-कौलवकर, सदाशिवराव चरापले, अरुण डोंगळे आदी नेत्यांनी करवीर व राधानगरी तालुक्यांतील मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. भोगावती साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने रविवारी मतदानादिवशी सत्तारूढ व विरोधी पॅनेलमध्ये कमालीची चुरस दिसून आली. ‘पॅनेल टू पॅनेल’ प्रचार सुरू असला तरी पॅनेलविषयी नाराजी असल्यास आपला बळी जाऊ नये म्हणून ‘माझ्यापुरतं बघा’ असा सिंगल व्होटिंगचा संदेश काही उमेदवारांनी रात्रीत मतदारांना दिल्याची चर्चा मतदान बहुतांश मतदान केंद्रांबाहेर सुरू होती.एकाच केंद्रात चार-पाच मतदान कक्ष!२१ जागांसाठी ७४ उमेदवार रिंगणात होते. बिगर उत्पादक गट वगळता एका सभासदाला दहा मतपत्रिका दिल्या होत्या. त्यामुळे साहजिकच मतदानासाठी वेळ लागणार म्हणून एका केंद्रात चार ते पाच मतदान कक्ष उभारले होते. परिणामी, मतदान केंद्राबाहेर फारशा रांगा दिसत नव्हत्या. शिरगावमध्ये दीडपर्यंत ८२ टक्के राधानगरी तालुक्यातील शिरगावमध्ये एका केंद्रावर दुपारी दीड वाजता २९६ पैकी २४२ मतदारांनी मतदान (८२ टक्के) केल होते. येथे एका-एका मतासाठी तिन्ही आघाड्यांमध्ये झटापट सुरू होती. प्रत्येक गावात ५०-१५० मतदार मृतकारखान्यासाठी ३० हजार ५१८ मतदान आहे; पण यातील सुमारे साडेतीन ते चार हजार सभासद मृत आहेत. प्रत्येक गावात जाईल त्या ठिकाणी ५० पासून १५० पर्यंत मृत सभासदांची यादीच कार्यकर्त्यांच्या हातात दिसत होती.