शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

‘ब्रेनडेड’ रवींंद्रच्या यकृताने भारत हसूरकरांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:42 IST

कोल्हापूर : सोलापूरमधील अपघातानंतर ब्रेनडेड झालेल्या रवींद्र श्रीरंग शिंगाडे यांच्या अवयदानामुळे कोल्हापुरातील भारत रामचंद्र हसूरकर (वय ४३, रा. बाबूजमाल परिसर) यांना जीवनदान मिळाले. त्यांच्यावर पुण्यातील आदित्य बिर्ला रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणाची १३ तासांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, ते आता पूर्ण शुद्धीवर आले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सक्रिय कार्यकर्त्या गीता हसूरकर यांचे ...

कोल्हापूर : सोलापूरमधील अपघातानंतर ब्रेनडेड झालेल्या रवींद्र श्रीरंग शिंगाडे यांच्या अवयदानामुळे कोल्हापुरातील भारत रामचंद्र हसूरकर (वय ४३, रा. बाबूजमाल परिसर) यांना जीवनदान मिळाले. त्यांच्यावर पुण्यातील आदित्य बिर्ला रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणाची १३ तासांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, ते आता पूर्ण शुद्धीवर आले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सक्रिय कार्यकर्त्या गीता हसूरकर यांचे ते पती आहेत.शिंगाडे कुटुंबीयांनी दाखविलेली माणुसकी मोलाची ठरल्याची प्रतिक्रिया गीता हसूरकर यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, ‘कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या दुर्धर आजारपणामुळे त्या कुटुंबाची मानसिक स्थिती खूपच खचलेली असते. अशा परिस्थितीत आपलेही पाठ फिरवितात, तेव्हा ते दु:ख अगणित असते. अशातच एखादे अनोळखी कुटुंब, जे आपल्यापेक्षाही जास्त दु:खात असूनही मदतीला धावून येते, तेव्हा कोण आपले आणि कोण परके याची प्रखरतेने जाणीव होते. रवींद्र शिंगाडे यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा घेतलेला निर्णय खऱ्या अर्थाने आमच्या कुटुंबाला जीवनदान देणारा ठरला.’त्याचे घडले असे : भारत हसूरकर हे एका फार्मसी कंपनीत विभागीय व्यवस्थापक म्हणून काम करीत होते. त्यांचा पारंपरिक सोनार कामाचा व्यवसायही आहे. त्यांना गेल्या दोन वर्षांपासून यकृताचा त्रास होत होता. त्यामुळे डॉक्टरनी त्यांना यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला होता. त्यानुसार त्यांनी पुणे, औरंगाबाद व मुंबई येथे यकृत हवे म्हणून नोंदणी केली होती. याच दरम्यान पुणे-सोलापूर द्रुतगती मार्गावर २० जुलैला रवींद्र शिंगाडे यांचा अपघात झाला. त्यामध्ये त्यांचा ब्रेन डेड झाल्यावर त्यांच्या पत्नीसह आई, वडील व भावाने अवयवदान करण्यास संमती दिली. त्यानुसार रवींद्र याचे हृदय, किडनी, स्वादुपिंड व यकृत दान करण्यात आले.सोमवारी (दि. २३) रात्री आठ वाजता त्यांचे यकृत पुण्यात आणण्यात आले व १३ तासांची शस्त्रक्रिया करून प्रत्यारोपण करण्यात आले. आता हसूरकर यांची प्रकृती कमालीची सुधारत आहे.शिंगाडे कुटुंबीयांचे आभार कसे मानावेत यासाठी शब्द अपुरे असल्याची भावना गीता हसूरकर यांनी व्यक्त केली आहे. रविंद्र यांच्या अवयव दानामुळे तब्बल चारजणांना नवे जीवन मिळाले आहे.शिंगाडे झाले अमरउभे आयुष्य ज्याच्यासोबत काढायचं होतं तोच आपल्याला अर्ध्या वाटेवरच सोडून जातोय, याचे दु:ख त्या कुटुंबाला सहन झाले नसेल; पण अशा परिस्थितीतही आपले दु:ख बाजूला सारून त्यांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आणि समाजासमोर एक चांगले उदाहरण ठेवले. रवींद्र शरीराने आपल्यात हजर नाहीत; परंतु दान केलेल्या अवयवाच्या माध्यमातून ते आजसुद्धा या जगात राहू शकतात.