शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘अमृत जल योजना’ बैठकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्कदानोळी : वारणा बचाव कृती समितीकडून आज, मंगळवारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात इचलकरंजीच्या अमृत पाणी योजनेबाबतच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्यात येणार आहे. त्या योजनेस कोणत्याही परिस्थितीत पाणी देणार नाही यावर कृती समिती ठाम आहे, असा निर्णय दानोळी येथील ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या कृती समितीच्या बैठकीत घेतला.दानोळीतील वारणा नदीतून इचलकरंजीला जाणारी अमृत ...

लोकमत न्यूज नेटवर्कदानोळी : वारणा बचाव कृती समितीकडून आज, मंगळवारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात इचलकरंजीच्या अमृत पाणी योजनेबाबतच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्यात येणार आहे. त्या योजनेस कोणत्याही परिस्थितीत पाणी देणार नाही यावर कृती समिती ठाम आहे, असा निर्णय दानोळी येथील ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या कृती समितीच्या बैठकीत घेतला.दानोळीतील वारणा नदीतून इचलकरंजीला जाणारी अमृत जल योजनेस वारणा काठावरील गावांचा विरोध आहे. ही योजना रद्द करण्यात यावी अशी शिफारस शासनास करावी, अशी भूमिका कृती समितीची आहे. पंचगंगा व कृष्णा या नद्यांतून इचलकरंजी शहराला बारमाही पाणीपुरवठा केला जातो. दोन मोठ्या पाणीपुरवठा योजनाही कार्यान्वित असताना या योजनांबाबत काही किरकोळ व तकलादू अशी कारणे पुढे करून गरज नसताना वारणा नदीतून शेतीचे पाणी उचलण्याचा घाट घातला जात आहे. तो अनावश्यक असून, शेतकºयांवर अन्यायकारक असल्याने वारणा काठावरील सर्व गावांनी या अमृत योजनेस विरोध असल्याचा ठराव करून दोनवेळा गाव बंद ठेवून तीव्र विरोध केला आहे.दोन्ही कालव्याची कामे अद्याप अपूर्ण आहेत, यासह अनेक कारणांमुळे अमृत योजनेस वारणा काठच्या गावांचा वारणा बचाव कृती समितीच्या माध्यमातून विरोध होता व तो यापुढेही राहील, असा निर्णय बैठकीत झाला.यावेळी वारणा बचाव कृती समिती अध्यक्ष महादेव धनवडे, उपाध्यक्ष केशव राऊत, सरपंच सुजाता शिंदे, उपसरपंच गब्रू गावडे, काँग्रेस शिरोळ तालुका अध्यक्ष सर्जेराव शिंदे, पंचायत समिती सदस्य सुरेश कांबळे, शिवसेना शिरोळ तालुकाप्रमुख सतीश मलमे, ग्रामपंचायत सदस्य जंबू सकप्पा, राजाराम माने, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पिसे, बाजार समिती सदस्य संदीप हवालदार, रामचंद्र शिंदे, रावसाहेब भिलवडे, गुंडू दळवी, बापूसो दळवी, मानजीराव भोसले, सुरेश माणगांवे, रावसाहेब खिचडे, उदय होगले, उमेश केकले, सोमा गावडे, श्रीकांत लंबे, प्रकाश लंबे उपस्थित होते.