शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

१२ डिसेंबरच्या ‘महालोक अदालत’वर बहिष्कार

By admin | Updated: November 3, 2014 00:45 IST

खंडपीठ प्रश्न : खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत निर्णय

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, या अनेक वर्षांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करण्यासाठी पुन्हा निर्णायक लढा उभारण्याची तयारी सहा जिल्ह्यांतील वकिलांनी दर्शविली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज, रविवारी खंडपीठ कृती समितीची बैठक जिल्हा बार असोसिएशनच्या हॉलमध्ये पार पडली. या बैठकीत खंडपीठ चळवळीबाबत, तसेच १२ डिसेंबरला होणाऱ्या राज्यव्यापी ‘महालोक अदालत’वर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती कृती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी दिली. कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सोलापूर व सिंधुदुर्ग अशा सहाही जिल्ह्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन व्हावे, या मागणीसाठी सहा जिल्ह्यांतील वकिलांनी गेल्यावर्षी २९ आॅगस्ट २०१३ पासून न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला होता. सर्किट बेंचसाठी ‘आर या पार’ची लढाई सुरू ठेवून जोपर्यंत उच्च न्यायालय निर्णय घेत नाही, तोपर्यंत माघार नाही, असा निर्धार १७ हजार वकिलांनी केला होता. ५८ दिवस सुरू राहिलेल्या या आंदोलनाची दखल अखेर शासनाने घेतली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्किट बेंचच्या प्रस्तावाला आर्थिक तरतुदींसह मंजुरी दिली. मुंबईतील ‘अ‍ॅडव्होकेट्स असोसिएशन आॅफ वेस्टर्न इंडिया’च्या सदस्यांनी तशी शिफारसही केली. या संदर्भात ३१ जानेवारी २०१४ अखेर निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी दिली होती. या घटनेला वर्ष होत आले तरीही न्यायाधीश शहा यांनी दिलेले वचन पार पाडले नाही. त्यामुळे ‘सर्किट बेंच’प्रश्नी पुन्हा नव्या जोमाने लढा उभारण्याचा निर्णय खंडपीठ कृती समितीने घेतला. त्यानुसार आज झालेल्या बैठकीत महालोक अदलत व उच्च न्यायालयाच्या प्रत्येक कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्या मुदतीत निर्णय न झाल्यास पुन्हा बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. बैठकीस अ‍ॅड. के. व्ही. पाटील, अ‍ॅड. एस. एन. मुद्गल, अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, अ‍ॅड. अशोक पाटील, अ‍ॅड. शिवराज जोशी, अ‍ॅड. दीपक पाटील, अ‍ॅड. संपतराव पवार, अ‍ॅड. विराज नलवडे, अ‍ॅड. ए. डी. धुमकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)डिसेंबरमध्ये मेळावाडिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सहा जिल्ह्यांतील वकिलांचा मेळावा आयोजित करण्याचा निर्णयही घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये सर्किट बेंच मंजुरीसाठी एक समयसीमा ठरवून दिली जाईल.