मोटारसायकलवरून ज्योतिबा दर्शनसाठी जात असलेल्या भाविकांच्या मोटारसायकलला चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोने जोरदार धडक दिलेने झालेल्या अपघातात दोघही गंभीर जखमी झाले. सर्जेराव आनंदराव थोरात रा. रेठरे हरणाक्ष, ता. वाळवा व सुनील महिपती गोडसे रा भवानीनगर बिचुद, ता. वाळवा अशी जखमीची नावे आहेत. गिरोली दाणेवाडी या मार्गावर बुधवारी दुपारी हा अपघात घडला.या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली आहे
याबाबत समजलेली माहिती अशी टेम्पो क्रमाक MH-09-BC -7918 गिरोली गावाकडे जात होता तर गिरोलीकडून ज्योतिबा डोंगराकडे दोन चाकी गाडी क्रं MH-10-DP-0388 वरून दोघेजण जात होते. टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने भाविकांच्या मोटारसायकलवर जाऊन जोरात धडकला. यावेळी दोन्ही भाविक गंभीर जखमी झाले. अपघातातील जखमींना उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे.