शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मुलांबरोबरच दोन मातांनी दिली दहावीची परीक्षा : सांगरूळ केंद्रावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 00:14 IST

कोपार्डे : माणसाला आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत शिक्षण घ्यायची संधी उपलब्ध असते, याचे उत्तम उदाहरण आज दहावीच्या परीक्षेच्या वेळी पाहायला मिळाले. सांगरूळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगरूळ येथील परीक्षा

ठळक मुद्देआयुष्यात प्रत्येक वळणावर शिक्षणाला महत्त्व असल्याचे सिद्ध

कोपार्डे : माणसाला आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत शिक्षण घ्यायची संधी उपलब्ध असते, याचे उत्तम उदाहरण आज दहावीच्या परीक्षेच्या वेळी पाहायला मिळाले. सांगरूळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगरूळ येथील परीक्षा केंद्रावर दहावीची परीक्षा सुरू आहे. यात आपल्या मुलांबरोबर जयश्री कुंभार (रा. सांगरूळ) व मनीषा नलवडे या दोन्ही मातांनी आपल्या मुलांबरोबर परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी हजेरी लावल्याने पर्यवेक्षक, सुपरवायझर व इतर मुलांमध्ये हा कुतुहलाचा विषय बनला आहे.

लताबाई सर्जेराव ताकमारे हे माहेरचे नाव असलेल्या नावावर दहावीच्या परीक्षेला बसलेल्या मनीषा महादेव नलवडे (रा. गणेशवाडी, ता. करवीर) या सांगरूळ येथील परीक्षा केंद्रावर गुरुवारी मराठीच्या पहिल्या पेपरला आल्या आणि वयस्कर असलेल्या या परीक्षार्थी विद्यार्थिनीकडे बघून इतर सर्वच मुलांचे डोळे विस्फारले. मनीषा या सध्या आशा वर्कर म्हणून काम पाहतात. मनीषा यांचा आदित्य नलवडे हा मुलगा दहावीची परीक्षा देत आहे. तर महेश नलवडे हा दुसरा मुलगा बारावीची परीक्षा देत आहे; पण आपले करिअर बनविण्यासाठी ग्रामीण भागातील महिलाही आता पुढे येत आहेत, हे या उदाहरणाने समोर आले आहे.

सांगरूळ येथील दुसºया महिला जयश्री तानाजी कुंभार (रा. सांगरूळ) या सध्या अंगणवाडीसेविका आहेत. त्यांची मुलगी श्रद्धा ही १२ वीची परीक्षा याच केंद्रावर देत आहे, तर पुतण्या प्रसाद कुंभार १० वीच्या परीक्षेला आपल्या चुलतीबरोबर परीक्षा केंद्रावर आला. त्यांचे लग्न अवघ्या १६व्या वर्षी झाले. यावेळी त्यांचे शिक्षण केवळ नववीपर्यंतच झाले होते; पण जयश्री कुंभार यांचे पती तानाजी कुंभार यांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित केले.

यशवंतराव मुक्तविद्यापीठात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेऊन दिला. येथे त्यांनी एस.वाय.बी.ए. पर्यंतचे शिक्षण घेतले आहे; पण दहावीच्या परीक्षेच्या प्रमाणपत्राशिवाय अनेक अडचणी निर्माण झाल्याने त्यांनी दहावीसाठी १७नंबरचा फॉर्म भरून दहावीच्या परीक्षेची तयारी सुरू केली. आज त्या परीक्षा केंद्रावर परिक्षार्थी म्हणून आल्याने चर्चेला उधाण आले. 

मला माझ्या पतीने शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. शक्यतो मुलींना शिक्षण देण्याबाबत पालकांमध्ये अनुत्सुकता दिसते. मात्र, भावी आयुष्यात करिअर करताना निर्माण होणाºया अडचणींमुळे महिला मागे पडतात; पण कोणाचा तरी पाठिंबा मिळाला, तर महिला आघाडीवर येऊ शकतात हे सत्य आहे. - जयश्री कुंभारशाळा शिकायची वेळ होती त्यावेळी मी शिक्षणाकडे दुर्लक्ष केले; पण शिक्षण हा बदलत्या काळाचा पाया आहे. यामुळे आपण कुठे मागे पडू नये म्हणून मी दहावीच्या परीक्षेला बसण्याचा चंग बांधला आणि मी चांगल्या टक्केवारीने पास होणार हा आत्मविश्वास मला आहे, असे सांगितले.- मनीषा नलवडे