गडहिंग्लज : शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी आणि गडहिंग्लज बाजार समिती वाचवण्यासाठी दोन्ही काँगे्रसवाल्यांना गाडा, असे आवाहन शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी रविवारी केले.गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विरोधी शिवशाहू शेतकरी आघाडीच्या प्रचार प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.दुधवडकर म्हणाले, जिल्हा बँकेतील प्रश्नासंदर्भात लवकरच पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली जाईल. स्वार्थी राजकारण शिवसेना खपवून घेणार नाही. माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, जिल्हा बँक देशोधडीला लावणारेच बँकेचे अध्यक्ष झाले आहेत. शेतकरी व बाजार समितीच्या भल्यासाठी परिवर्तन करा. राजेंद्र गड्यान्नावर म्हणाले, सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे संकेश्वरी मिरचीचे वाण संपुष्टात आले आहे. सेस बुडविणारे माफिया आणि भ्रष्ट संचालकांचे साटेलोटे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी संचालक मंडळावर असायला हवेत.संग्रामसिंह कुपेकर म्हणाले, चार वर्षांपासून दौलत कारखाना बंद आहे. गडहिंग्लज कारखाना चालवायला दिला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे शासनाने नवीन कारखाना द्यावा, एक वर्षाच्या आत कारखान्याची उभारणी करून दाखवतो.शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, विजय देवणे, मुरलीधर जाधव व विजय पोवार, ‘स्वाभिमानी’चे आजरा तालुकाध्यक्ष तानाजी देसाई, गडहिंग्लज कारखान्याचे संचालक भैरू पाटील, प्रा. सुभाष शिरकोळे, संकेश्वर साखर कारखान्याचे संचालक सोमगोंडा आरबोळे यांचीही भाषणे झाली. मेळाव्यास संभाजी पाटील, बाळासाहेब कुपेकर, भय्या कुपेकर, उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित होते. तालुकाप्रमुख दिलीप माने यांनी स्वागत केले. प्रा. सुनील शिंत्रे यांनी प्रास्ताविक केले. सूर्यकांत देसाई यांनी आभार मानले. प्रचाराला येणार सहा आमदार !गडहिंग्लज बाजार समितीमधील भ्रष्टाचार व शेतकऱ्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी विरोधी आघाडी साकारल्याबद्दल सर्वांचे कौतुक आहे. प्रा. सुनील शिंत्रेंसह जिल्ह्यातील शिवसेनेचे सहा आमदार आघाडीच्या प्रचाराला येतील, अशी ग्वाही संपर्कप्रमुख दूधवडकरांनी दिली.
दोन्ही भ्रष्टवादी काँगे्रसवाल्यांना गाडा
By admin | Updated: July 19, 2015 23:42 IST