शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यामध्ये लाचखोरांचा टक्का वाढतोय

By admin | Updated: February 8, 2016 00:29 IST

‘लाचलुचपत’च्या अधिकाऱ्यांचे मत : पैशाच्या मोहापुढे कारवाईची भीती नाही; अधिकारी, कर्मचारी निर्ढावले

एकनाथ पाटील -- कोल्हापूर -कोल्हापूर जिल्ह्यात २०१५ मध्ये ३२ गुन्हे दाखल आहेत, तर २०१६ मध्ये अवघ्या दोन महिन्यांत तब्बल ५ गुन्हे दाखल आहेत. जिल्ह्यात लाचखोरांचा टक्का दिवसेंदिवस वाढत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. कमी श्रमात जास्त पैसे मिळविणे, तत्काळ जामीन मिळत असल्याने कायद्याचा धाक नाही, वरिष्ठांचे दुर्लक्ष, दहांपैकी एकच व्यक्ती तक्रार देण्यास पुढे येते, अन्य नऊजण लाच देऊन कामे करून घेतात. यामुळे शेकडो कारवाई होत असल्या तरी शासकीय कार्यालयातील लाच स्वीकारण्याचे प्रमाण काही कमी झालेले नाही. पैशाच्या मोहापुढे कारवाईची भीती नाही, अशी लाचखोरांची प्रवृत्ती असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांचे मत आहे. महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, आरटीओ, नगर भूमापन, बँका, रजिस्ट्रेशन, अन्न व औषध प्रशासन, कारागृह, महावितरण, आदी कार्यालयांत कामाच्या मोबदल्यात लाच स्वीकारणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या राज्यातील आठ परिक्षेत्रांमध्ये एकमेव पुणे परिक्षेत्रातील कोल्हापूर विभागाचा कारवाईचा टप्पा सर्वाधिक आहे. त्यामुळे कोल्हापुरात लाचखोरांची संख्या जास्त असल्याचे कागदोपत्री स्पष्ट झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून महिन्याला चार ट्रॅप केले जातात. लाच देऊ नये, लाच देणे आणि घेणे हा कायदेशीर गुन्हा आहे, अशा पद्धतीने नागरिकांत प्रबोधन केले जात आहे. पोस्टरबाजी, पत्रकबाजी, प्रसारमाध्यमांतूनही जनजागृती केली जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात जनजागृती, कारवाई होत असताना लाच घेणे काही कमी झालेले नाही. शासकीय कार्यालयांतील विशिष्ट अधिकारी व कर्मचारी निर्ढावले आहेत. लाच स्वीकारल्यानंतर तत्काळ जामीन मिळतो. काही गुन्ह्यांमध्ये उशिरा निकाल लागल्याने अधिकारी बदलून जातात, तर फिर्यादी नको ती कटकट म्हणून आरोपीलाच फितूर होत असतात. त्यामुळे अशा काही प्रकरणांत आरोपी निर्दोष सुटतात. या सर्व कारणांमुळे लाचेच्या कारवाईची भीतीच राहिलेली नाही. समोर खड्डा खोदला आहे, हे दिसत असतानाही शासकीय कार्यालयातील कर्मचारी त्यात उडी मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. कमी श्रमांत जास्त पैसे मिळविणे ही मानवी प्रवृत्ती आहे, ती बदलली पाहिजे. दहापैकी एक नागरिक तक्रार देतो, अन्य नऊजण पैसे देऊन कामे करून घेतात. त्यामुळे एकाही नागरिकाने पैसे दिले नाहीत, तर लाच घेण्याचे प्रमाण कमी होणार आहे. वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात. त्यांचे मनपरिवर्तन करीत नाहीत. त्यामुळे बहुतांश सर्वच शासकीय कार्यालयांत लाच घेऊन कामे केली जात असल्याचे चित्र आहे. लोकांनी निर्भयपणे तक्रार देण्यास पुढे यावे. आम्ही स्वत:हून प्रत्येक शासकीय कार्यालयात जाऊन प्रलंबित प्रकरणांसाठी उंबरे झिजविणाऱ्या नागरिकांची भेट घेऊन त्यांना दिलासा देत आहोत. त्यामुळे सध्या तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. - उदय आफळे, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग. कारवाईचा टक्कामहसूल १३पोलीस १२नगरविकास ७पाटबंधारे १कारागृह १अन्न व औषध प्रशासन १महावितरण१प्रादेशिक परिवहन१