शहरं
Join us  
Trending Stories
1
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
2
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
3
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
4
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
5
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
6
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
7
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
8
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
9
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
10
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
11
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
12
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
13
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
14
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
15
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
16
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
17
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
18
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
19
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
20
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला

सीमा आंदोलन; हुतात्म्यांच्या वारसांना न्याय

By admin | Updated: May 6, 2015 00:19 IST

निवत्तिवेतनात वाढ : सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय; राज्यातील चौदाजणांना लाभ

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर -महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात हौतात्म्य आलेल्या वारसांच्या निवृत्तिवेतनात दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. वाढीव वेतनाप्रमाणे आता दरमहा १० हजार रुपये मिळणार आहेत. एप्रिल आणि मे महिन्यांसाठी चौदा वारसांसाठी तीन लाख ४३ हजार रुपये संबंधित जिल्हा प्रशासनाकडे शासनाने २७ एप्रिल २०१५ रोजी वितरित केले आहेत. यासंबंधीचा आदेश सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रि. इ. शेख यांनी पाठविला आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी १९५६ मध्ये लढा तीव्र झाला होता. त्यानंतर १९५६ मध्ये कन्नडसक्तीच्या विरोधात आंदोलन व्यापक बनले. या दोन्ही आंदोलनांत मृत्यू पावलेल्यांना शासनाने हुतात्मे म्हणून घोषित केले. हुतात्म्यांच्या हयात पत्नी, आई, वडील यांपैकी एकास पहिल्यांदा एक हजार रुपये मासिक वेतन दिले जात होते. सन १९९९ मध्ये ते पंधराशे करण्यात आले. त्यानंतर २०१० मध्ये दरमहा ते आठ हजार रुपये करण्यात आले. २१ एप्रिल २०१५ रोजी पुन्हा दोन हजारांची वाढ करून दरमहा दहा हजार रुपये करण्यात आले आहे. ही वाढ २ आॅक्टोबर २०१४ पासून दिली जाणार आहे. सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत दरमहा हे वेतन वितरित केले जाते. वाढीव निवृत्तिवेतनानुसार सन २०१५-१६ सालाची एकूण २० लाख ६३ हजार रक्कम देय आहे. यातील एप्रिल आणि मे या दोन महिन्यांसाठी ३ लाख ४२ हजार रुपये संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शासनाने वितरित केले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील नऊ हुतात्म्यांच्या वारसांना कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे हे निवृत्तिवेतन वितरित केले जाते. चार वर्षांनंतर शासनाने दोन हजारांची वाढ केल्यामुळे वारसांतून समाधान व्यक्त केले जात आहे.शासनाने नियमित वाढीतून दोन हजारांची वाढ हुतात्म्यांच्या वारसांना केली आहे. मात्र, प्रत्यक्षात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ हुतात्मे झाले असताना १४ वारसांना निवृत्तिवेतन दिले जाते, ही खेदाची बाब आहे. बेळगाव जिल्ह्यातील नऊ वारसांना निवृत्तिवेतन कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून दिले जाते. आणखी पाच हुतात्म्यांच्या वारसांना मदत मिळावी, यासाठी अनेक वर्षांपासून महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.- मालोजी अष्टेकर, नेते, महाराष्ट्र एकीकरण समिती (बेळगाव)