येथील देसाई हॉस्पिटल व कार्डीॲक केअर सेंटरमध्ये बसविण्यात आलेल्या गडहिंग्लज विभागातील पहिल्या ‘कॅथलॅब’ मशीनचे उद्घाटन मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. निडसोशी मठाचे मठाधिपती श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात हा कार्यक्रम पार पडला. मुश्रीफ म्हणाले, गोर-गरीब रुग्णांच्या हितासाठीच आपण देसाई हॉस्पिटलमध्ये म. फुले आरोग्य योजना सुरू केली आहे. त्यांच्या माध्यमातून गडहिंग्लज विभागात ॲन्जीओग्राफी व ॲन्जीओप्लास्टीची सुविधा उपलब्ध झाली याचा विशेष आनंद आहे.शिवलिंगेश्वर महास्वामीजी म्हणाले, डॉ. देसाई व त्यांचे सुपुत्र डॉ. रोहित यांनी कोरोनामध्ये उत्तम काम केले आहे. नव्या मशीनमुळे हृदयरोगींना जीवदान मिळण्यास मदत होईल.कार्यक्रमास डॉ. एम. एस. बेळगुद्री, डॉ. रवींद्र हत्तरकी, डॉ. सुभाष पाटील, नगरसेवक हारुण सय्यद, सिद्धार्थ बन्ने, गुंड्या पाटील, महेश सलवादे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. डॉ.चंद्रशेखर देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. रोहित देसाई यांनी आभार मानले.
फोटो ओळी : गडहिंग्लज येथील देसाई हॉस्पिटलमध्ये ‘कॅथलॅब मशीन’चे उद्घाटन मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी, डॉ. सुषमा देसाई, डॉ. रोहित देसाई, डॉ. दिशा देसाई, डॉ. चैताली देसाई आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०८०९२०२१-गड-०४