शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बालकांसाठी दहा रुपयांत पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 23:03 IST

संतोष मिठारी। लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : बालकांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी आजरा येथील चैतन्य सृजन व सेवा संस्थेने एक वेगळा ...

संतोष मिठारी।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : बालकांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी आजरा येथील चैतन्य सृजन व सेवा संस्थेने एक वेगळा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत अवघ्या दहा रुपयांत पुस्तके उपलब्ध करून दिली जात आहेत. गेल्या आठ वर्षांपासून लोकवर्गणी आणि देणगीतून हा उपक्रम राबविला जात आहे.सध्या सोशल मीडियाच्या युगात बहुतांश बालके वाचनापासून दूर जात आहेत. अशा स्थितीत त्यांच्यामध्ये वाचनसंस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने संस्थेने १५ आॅगस्ट २०१० रोजी अवघ्या ‘दहा रुपयांत पुस्तके’ हा उपक्रम सुरू केला. त्यासाठी या संस्थेने मासिक ऋग्वेद चिल्ड्रन रिलीफ फंडाचीनिर्मिती केली.या उपक्रमांतर्गत विविध प्रकारची २५ पुस्तके उपलब्ध आहेत. त्यामध्ये विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राजाभाऊ शिरगुप्पे, सुभाष विभूते, पृथ्वीराज तौर, सुनील सुतार, चंद्रकांत निकाडे, फारूक काझी,पी. जे. कांबळे, डॉ. शिवशंकर उपासे, बाळ पोतदार, माधुरी माटे,सावित्री जगदाळे, आदी लेखक-लेखिकांच्या पुस्तकांचा समावेशआहे. ही पुस्तके महाराष्ट्रासह देशभरातील मराठी भाषिकांपर्यंत पोहोचविली जातात.आॅडिओ बुकही उपलब्धलेखक फारूक काझी यांचे ‘मित्र’ हे पुस्तक क्यूआर कोडच्या साहाय्याने मोबाईलमध्ये आॅडिओ बुक स्वरूपात तयार केले आहे. मराठी बालवाङ्मयातील ही पहिलीच कल्पना आहे. कवयित्री माया धुप्पड यांचा ‘गरगर घागर’ कथाकाव्यसंग्रहही आॅडिओ बुकमध्ये उपलब्ध आहे. त्यातील गीते बालक आणि गायकांनी गायलेली आहेत.१ लाख पुस्तकविक्री‘दहा रुपयांत पुस्तके’ या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत एक लाख पुस्तकांची विक्री झाली आहे, असे चैतन्य सृजन व सेवा संस्थेचे खजिनदार सुभाष विभूते यांनी सांगितले. ते म्हणाले, बालकांसाठी अल्प मूल्यामध्ये संपूर्ण रंगीत पुस्तके प्रकाशित करणार आहोत.