शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या वाढदिवसानिमित्त पुस्तके भेट, वारेमाप खर्चाला फाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 17:03 IST

मुलांचा वाढदिवस म्हणजे महागडे कपडे, सजावट, हॉटेलमध्ये बुकिंग, पार्टी, भोजनावळी, भला मोठा केक आणि उपस्थित मुलांना आकर्षक गिफ्ट असा वारेमाप खर्च केला जातो. मात्र, या खर्चाला फाट देत मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी कदम कुटुंबीयांनी नंदवाळ (ता. करवीर) येथील जिल्हा परिषदेच्या विद्यामंदिर नंदवाळ शाळेतील मुलांना पुस्तके वाटप केली. शाळेच्या ग्रंथालयाला शंभर दर्जेदार पुस्तके भेट दिली.

ठळक मुद्दे मुलीच्या वाढदिवसानिमित्त पुस्तके भेट, वारेमाप खर्चाला फाटाजिल्हा परिषदेच्या नंदवाळ शाळेत उपक्रम

कोल्हापूर : मुलांचा वाढदिवस म्हणजे महागडे कपडे, सजावट, हॉटेलमध्ये बुकिंग, पार्टी, भोजनावळी, भला मोठा केक आणि उपस्थित मुलांना आकर्षक गिफ्ट असा वारेमाप खर्च केला जातो. मात्र, या खर्चाला फाट देत मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी कदम कुटुंबीयांनी नंदवाळ (ता. करवीर) येथील जिल्हा परिषदेच्या विद्यामंदिर नंदवाळ शाळेतील मुलांना पुस्तके वाटप केली. शाळेच्या ग्रंथालयाला शंभर दर्जेदार पुस्तके भेट दिली.आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे, अशी तक्रार सर्वच थरातून वाढते आहे. वाचन संस्कृती टिकवून धरण्यासाठी वाचनाची आवड मुळातूनच निर्माण होणे आवश्यक आहे. मुलांमध्ये वाचन वेड उत्पन्न व्हायचे असेल तर तशी परिस्थिती त्यांच्याभोवती निर्माण होणे गरजेचे आहे, ही गरज ओळखून वाचन कट्टा या संस्थेचे अध्यक्ष युवराज कदम यांनी आपली कन्या राजनंदिनी हिच्या वाढदिवसानिमित्त नंदवाळ शाळेतील मुलांना मोफत पुस्तके वाटप केली. नंदवाळ शाळेच्या ग्रंथालयाला पुस्तके भेट दिली.वाढदिवसाच्या माध्यमातून आपल्या कन्येचा आनंद द्विगुणित करण्यासोबत समाजातील वाचनाची गरज ओळखून पुस्तकरूपी ज्ञानभेट देऊन एक नवा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे. या उपक्रमाला वाचनकट्टा संस्थेचे उपाध्यक्ष संतोष वडेर, राजनंदिनीचे आजोबा सतबा कदम, आजी हिराबाई कदम, कपिल चौगुले, ओंकार कागिंकर, शाळेचे मुख्याध्यापक रंगराव गडकर, अर्जुन पाटील, वैशाली राव, संदीप मगदूम, आदी उपस्थित होते.

आजच्या धकाधकीच्या जीवनात इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या दुनियेत मुले गुंतली आहेत. माणसाचे जीवन फुलविण्यात वाचनाचा महत्त्वाचा वाटा असतो. वाचन छंद बालपणापासून रुजविण्यासाठी आम्ही पुस्तके भेट दिली.- वनिता कदम

 

 

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूर