शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्बसदृश घटना निव्वळ खोडसाळपणाच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:24 IST

कोल्हापूर : जयसिंगपूर आणि कुरुंदवाड या दोन ठिकाणच्या बॉम्बसदृश घटना हा निव्वळ खोडसाळपणाच्या आहेत. त्याच्या मुळापर्यंत आम्ही पोचलो आहोत, ...

कोल्हापूर : जयसिंगपूर आणि कुरुंदवाड या दोन ठिकाणच्या बॉम्बसदृश घटना हा निव्वळ खोडसाळपणाच्या आहेत. त्याच्या मुळापर्यंत आम्ही पोचलो आहोत, अशी माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

अधीक्षक बलकवडे म्हणाले, जयसिंगपूर येथे हॉस्पिटलमध्ये तर कुरुंदवाड येथे हॉटेलमध्ये बॉम्ब आढळल्याच्या खोडसाळपणाच्या घटना दोन दिवसांपूर्वीच घडल्या. मात्र हे बॉम्ब नसून प्लास्टिकच्या कांड्या आणि चिकटटेप होत्या. आम्ही तेथे बीडीएसचे पथक पाठविले होते. प्रत्यक्षात तेथे बॉम्ब नसल्याचे दिसून आले. त्यांच्या अभ्यासातही तेथे कोणतेही स्फोटक पदार्थ नसल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही घटनांच्या चौकशीसाठी स्वतंत्र पथके नेमकी आहेत. काहीजण जाणीवपूर्वक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. लोकांनी घाबरून जाऊ नये, तसेच अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असेही ते म्हणाले.

होळी, धुलिवंदन साधेपणाने करा...

देशात सर्वाधिक कोरोनाचा धोका असलेल्या दहा जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे दुदैवाने महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढू नये याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी. आगामी होळी व धुलिवंदन सण हे साधेपणाने साजरे करावेत. उत्साहाने रस्त्यावर उतरून कोणी अतिरेक केल्यास त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे निर्देश अधीक्षक बलकवडे यांनी दिले. या सणावेळी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.