शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतून बोलेरो गाडी चोरणाऱ्यास अटक

By admin | Updated: December 27, 2015 01:30 IST

अकबर मोहल्यातील साथीदार फरार

कोल्हापूर : मुंबई येथून बोलेरो जीपची चोरी करून कोल्हापुरात वावरणाऱ्या चोरट्यास लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री अटक केली. संशयित आरोपी परवेझ साजदखान पटेल (वय ४९, रा. सी वॉर्ड, घिसाड गल्ली, सोमवार पेठ) असे त्याचे नाव आहे. त्याचा अकबर मोहल्यामध्ये राहणारा साथीदार फरार असून, त्याचा पोलीस शोध घेत असल्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी सांगितले. लक्ष्मीपुरी ठाण्याचे पोलीस गुरुवारी रात्री शहरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी ते पंचगंगा शिवाजी पुलाकडून स्मशानभूमी मार्गे जुना बुधवारपेठ सिद्धार्थनगरकडे जात असताना चिंचेच्या झाडाखाली अंधारात काळ््या रंगाची बोलेरो जीप उभी असल्याची दिसली. या जीपचा संशय आल्याने त्यांनी जवळ जाऊन नंबर पाहिला असता तो (एमएच ०२ केए ७१५८) दिसून आला. आतमध्ये चालकाच्या शिटवर बसलेल्या व्यक्तीकडे विचारपूस केली असता त्याने नाव सांगून गाडीअड्डा येथे स्क्रॅपचा व्यवसाय करीत असल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यात असलेली जीप मुुंबई पासिंगची असल्याने तिच्या कागदपत्रांविषयी चौकशी केली असता ते दाखविण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर पोलीस ठाण्यात आणून खाकी दाखविताच त्याने बोलेरो जीप ही मित्र सिमन गुलाब झारी (रा. अकबर मोहल्ला, सोमवार पेठ) याने चोरून आणली आहे. त्याच्याकडून दीड लाख रुपयांना विकत घेतल्याचे सांगितले. तसेच गाडीचा मूळ नंबर (एमएच ०२ बीजी ०७१८) असा असताना तो बदलून गेल्या सहा महिन्यांपासून आपण जीप कोल्हापुरात फिरवित असल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. त्याचा साथीदार अद्याप फरार असून, त्यांची टोळी असण्याची शक्यता आहे. त्यानुसार कसून तपास सुरूअसल्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)