शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बोगस ‘टीडीआर’प्रकरणी मोजणी नकाशा अखेर रद्द

By admin | Updated: August 4, 2015 00:43 IST

भूपाल शेटे : चुकीची मोजणी करणाऱ्यांवर कारवाई करा

कोल्हापूर : महानगरपालिकेत गाजत असलेल्या बोगस टीडीआर प्रकरणातील मोजणी नकाशा अखेर करवीर भूमी अभिलेख कार्यालयाच्या उपअधीक्षकांनी रद्द केला. त्यामुळे पैसे फेकले की काहीही करता येऊ शकते, या प्रवृत्तीला चांगलाच चाप बसल्याची माहिती नगरसेवक भूपाल शेटे यांनी याबाबत माहिती दिली. या प्रकरणात भूमी अभिलेख कार्यालयातील ज्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी चुकीची मोजणी करून फसवणूक करण्याच्या इराद्याने नकाशा दिला, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पुणे जमाबंदी आयुक्त यांच्याकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शेटे यांनी सांगितले की, राधानगरी रोडवरील रि.स.नं. १०१०/१अ या क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या जागेचा खोटी कागदपत्रे सादर करून त्या जागेचा घेतला जाणारा दोन लाख स्क्वेअर फुटाचा टीडीआर आयुक्तांनी स्थगित केला होता. परंतु, त्यानंतर मनपा अधिकारी व बांधकाम व्यावसायिक धैर्यशील यादव यांनी दुसऱ्याच एका तीन गुंठे जमिनीची ९९ हजार स्क्वेअर फूट जागा असल्याचे भासवून टीडीआर घेण्याचे प्रयत्न सुरू केले होते. त्याची माहिती मिळताच आपण लेखी तक्रार करून संबंधितांना सावध केले होते. त्यामुळे त्याची चौकशी करून भूमी अभिलेख उपअधीक्षकांनी मोजणी नकाशाच रद्द केला. ज्यांनी चुकीचा मोजणी नकाशा तयार करून दिला, त्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी जमाबंदी आयुक्त यांच्याकडे करणार असल्याचे शेटे यांनी सांगितले. तसेच ३० वर्षांचा सर्च रिपोर्ट पाहून ही जमीन फ्री होल्ड आहे, असा अभिप्राय देणाऱ्या मनपा वकील प्रशांत चिटणीस यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही शेटे यांनी आयुक्तांकडे केली आहे. प्रक्रिया थांबवलीयादव यांनी १६ फेब्रुवारीला मोजणीची मागणी केली होती, त्यानुसार १० एप्रिलला जागेची मोजणी करण्यात आली होती. परंतु, नंतर ०.९९ आर. क्षेत्रावर यादव यांचे नाव नसल्याचे ७/१२ पत्रकी आढळून आले. त्यामुळे १५ दिवसांत सुधारित ७/१२ उतारा सादर करण्यात यावा, म्हणून उपअधीक्षक पल्लवी शिरकाळे यांनी नोटीस दिली होती. तरीही त्यांनी तो दिला नाही. म्हणून मोजणी नकाशा २७ जुलैला रद्द करण्यात आला. त्यामुळे आता ही बोगस प्रक्रियाही थांबवावी लागेल, असे शेटे यांनी सांगितले.