शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
3
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
4
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
6
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
7
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
8
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
9
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
10
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
11
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
12
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
13
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
14
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
15
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
16
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
17
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
18
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
19
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...

पन्हाळा-शाहूवाडीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

By admin | Updated: January 14, 2015 00:33 IST

कारवाई करण्याची मागणी : चुकीचे उपचार बेतले अनेक रुग्णांच्या जिवावर

देवदास वरेकर - पन्हाळा शाहूवाडी तालुक्यांत गेल्या काही वर्षांपासून बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. या बोगस डॉक्टरांच्या उपचारांमुळे अनेक रुग्णांना आपल्या प्राणास मुकावे लागल्याची उदाहरणे आहेत. पन्हाळा तालुक्यातील कोलिक, पडसाळी, बांदिवडे, बांदेवाडी, धामणी खोरा तसेच शाहूवाडी तालुक्यातील उदगीर, विशाळगड, येळवणजुगाई, कासारवाडी, सोनुर्ले, धनगरवाडा, आदी ठिकाणी या डॉक्टरांचा व्यवसाय चालू असून, यापैकी काही ठिकाणच्या डॉक्टरांचा व्यवसाय चालू असून, यापैकी काही ठिकाणच्या डॉक्टरांनी यापूर्वी चुकीची उपचारपद्धती करून खळबळ माजवून दिली होती. या चुकीच्या उपचारांमुळे अनेकांना इहलोकीची यात्रा करावी लागली आहे. अशा प्रकारच्या अनेक घटना गेल्या काही वर्षांत घडूनही हा व्यवसाय करणारे डॉक्टर नामानिराळेच राहिल्याने तालुक्यातील जनतेतून आश्चर्य व्यक्त होत आहे. काही वर्षांपूर्वी शासनाने बोगस डॉक्टरांना पकडण्यासाठी एक समिती स्थापन करून कारवाई करण्याची मोहीम उघडली होती. त्यावेळेपुरता या डॉक्टर महाशयांनी आपला बाडबिस्तारा गुंडाळला होता. मात्र, पुन्हा या व्यवसायाने जोर धरल्याचे दोन्ही तालुक्यांत पाहावयास मिळत आहे. यापूर्वी बोगस डॉक्टरांवर छापा टाकून त्यांना पकडण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर दोन्ही तालुक्यांतील एकाही बोगस डॉक्टरांवर कारवाई झाली नसल्याने शासनाचा आदेश कागदावरच राहणार काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासन पातळीवरून अशा डॉक्टरांविषयी प्रसारित होणाऱ्या बातम्यांमुळे सावधगिरी बाळगली जात आहे. या डॉक्टरांच्याकडे कोणतेही अधिकृत प्रमाणपत्र नसल्याने हे बोगस डॉक्टर रुग्णांकडून भरमसाठ पैसे उकळतात. दोन्ही तालुक्यांत असा व्यवसाय करणाऱ्यांपैकी काहीजण हा एकच व्यवसाय करीत आहेत. अति उच्च क्षमतेचे अंतिम स्थितीत द्यायचे औषध रुग्णाला सुरुवातीलाच देण्यात येत असल्याने अशा डॉक्टरांकडे रुग्णांना तत्काळ तात्पुरता ‘गुण’ येत असला, तरी हाच उपाय काही रुग्णांना जीवघेणा ठरला आहे.