शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण मंडळ सभापती निवड १३ आॅक्टोबरला

By admin | Updated: October 2, 2015 01:14 IST

इचलकरंजी नगरपालिका : तब्बल सात महिन्यांनी निवड होणार असल्याने उत्सुकता

इचलकरंजी : येथील नगरपालिका शिक्षण मंडळाकडील सभापतिपदाची निवडणूक तब्बल सात महिन्यांनी होऊ घातली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा शिक्षण अधिकारी सुभाष चौगुले यांनी निवडणुकीसाठी १३ आॅक्टोबर ही तारीख निश्चित केली आहे. सन २०१३ मध्ये नगरपालिका शिक्षण मंडळाची निवडणूक होऊन त्यामध्ये कॉँग्रेसचे सहा, राष्ट्रवादीचा एक व शहर विकास आघाडीचे तीन सदस्य निवडले गेले. कॉँग्रेसकडे असणाऱ्या सहा सदस्यांना सभापतिपदाची संधी देण्याचे पक्षश्रेष्ठींनी ठरविले. फेब्रुवारी २०१५ मध्ये तौफिक मुजावर यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिला. मात्र, नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी राजीनामा देण्यास नकार देऊन केलेल्या बंडामुळे तेथील बदललेल्या राजकीय स्थितीचे पडसाद शिक्षण मंडळातही उमटले. उपसभापती नितीन कोकणे यांच्याकडे प्रभारी सभापतिपदाचा पदभार असताना त्यांनी ठरलेल्या तीन आठवड्यांच्या कालावधीत सभापतिपदाची निवडणूक लावली नाही. शिक्षण अधिकाऱ्यांनी जुलै महिन्यापर्यंत सभापतीची निवडणूक लावली नाही. म्हणून कॉँग्रेसच्या सदस्यांनी निवडणूक घेण्याबाबत जोरदार मोहीम उघडली. अखेर शिक्षण अधिकारी चौगुले यांनी १३ आॅगस्ट रोजी सभापतिपदाची निवडणूक जाहीर केली. मात्र, शिक्षण मंडळाकडे शासन नियुक्त सदस्यांची नेमणूक केली नसल्याने मंडळाची संख्या अपूर्ण आहे. सभापती निवड अशी तक्रार शहर विकास आघाडीचे सदस्य राजू हणबर यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली. त्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी सभापतीच्या निवडणुकीस स्थगिती दिली. दरम्यानच्या काळात शिक्षण मंडळावर विलास रानडे व जया हुरकट या दोघा भाजप पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. (प्रतिनिधी)शिक्षण मंडळातील बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार कॉँग्रेसकडे सहा, तर राष्ट्रवादी-शहर विकास आघाडी यांचे मिळून सहा सदस्य असे बलाबल झाले आहे. परिणामी गटशिक्षण अधिकारी यांना या निवडणुकीस उपस्थित राहण्याचे सांगून त्यांनी राष्ट्रवादी-‘शविआ’च्या बाजूने मतदान करावे.ज्यामुळे कॉँग्रेसच्या विरोधातील सभापती निवड केली जाईल, अशी राजकीय खेळी करण्याची तयारी ‘शविआ’ने केली आहे. त्यामुळे तब्बल सात महिन्यांनी होणाऱ्या सभापति-पदाच्या निवडीमध्ये रंगत येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.