शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहातून बाहेर पडणार म्हणूनच खून-: कैदी जाधव याची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 12:44 IST

नात्यातील मुलीवर सामूहिक अत्याचार करून निर्दोष सुटणार असल्याच्या रागातून कैदी सुनील मारुती माने (वय ३५, रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याचा डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली संशयित कैदी परमेश्वर ऊर्फ देवा नानासाहेब जाधव (वय २४, रा. कोडेगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याने दिली.

ठळक मुद्देनात्यातील मुलीवरील अत्याचाराचा सूडशुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, १० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

कोल्हापूर : नात्यातील मुलीवर सामूहिक अत्याचार करून निर्दोष सुटणार असल्याच्या रागातून कैदी सुनील मारुती माने (वय ३५, रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याचा डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली संशयित कैदी परमेश्वर ऊर्फ देवा नानासाहेब जाधव (वय २४, रा. कोडेगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याने दिली. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, १० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

सुनील माने याच्यावर नातेपुते पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद होता. त्याने जाधव याच्या नात्यातील मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याने ९ डिसेंबर २०१८ पासून कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होता; तर परमेश्वर ऊर्फ देवा जाधव हा ‘मोक्का’तील आरोपी आहे. माने याच्या नातेवाइकांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांशी मध्यस्थी करून हे प्रकरण न्यायालयातून मिटविण्याचे ठरविले होते. तशी तयारी दोन्ही बाजूंनी केली होती. माने हा अत्याचार करून पुन्हा खुलेआम गावात फिरणार हे माझ्या बुद्धीला पटत नव्हते. त्या सुडातून २७ जूनला मानेच्या डोक्यात दगड घालून खुनी हल्ला केल्याची कबुली संशयित जाधव याने दिली आहे. दरम्यान, नातेपुते गावात ९१ गुंठे शेतजमीन आहे. या वादातूनच सुनीलला सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यात गोवल्याचा आरोप करीत, सुपारी देऊन त्याचा खून केल्याचे बंधू अनिल माने यांनी पोलिसांना सांगितले होते. त्या दृष्टीनेही पोलीस तपास करीत आहेत. आज, शनिवारी त्याला कारागृहात तपासासाठी फिरविले जाणार आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव तपास करीत आहेत.प्रार्थना व खूनहीसंशयित कैदी जाधव याचे सुनिल माने याच्याशी कारागृहातील वर्तन चांगले होते. गेल्या कांही दिवसांत ते दोघे सकाळ-सायंकाळच्या प्रार्थनेलाही एकत्रित जात होते. त्यातून सलोखा वाढवून जाधव याने अत्यंत नियोजनबध्दपणे हा खून केल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यासाठीचा दगडही त्याने आधी हेरून ठेवला होता. कारागृहातील सीसीटीव्हीमध्ये याचे चित्रीकरणही झाले आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMurderखून