बिद्री (ता. कागल) येथे डॉ. वाय. पी. पाटील फौंडेशनने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. युवराज पाटील होते.
डॉ. वाय. पी. पाटील म्हणाले, फौंडेशनच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविले जातात. रक्तदात्यांना श्रद्धा हॉस्पिटलमार्फत एक लाख रुपयांचा मोफत विमा काढण्यात आला आहे.
यावेळी डॉ. तानाजी हरेल, डॉ. यू. बी. सरदेसाई, डॉ. दिगंबर खाडे, डॉ. के. डी. फराकटे, डॉ. सुहास पाटील, डॉ. दिलीप पाटील, पंचायत समितीचे सदस्य जयदीप पोवार, ग्रामपंचायतीचे सदस्य समाधान म्हातुगडे, मधुकर भोसले, शहाजी गायकवाड, एम. एम. चौगले, सागर कांबळे, गीता माने, यशवंत मेंगाणे उपस्थित होते.
फोटो ओळी- बिद्री (ता. कागल) येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना माजी खासदार धनजंय महाडिक, डॉ. युवराज पाटील व इतर उपस्थित हाेते. (छाया : प्रशांत साठे)