उचगाव : कोविड - १९ च्या पार्श्वभूमीवर रुग्णांना रक्ताची गरज ओळखून संयुक्त छत्रपती शिवाजीनगर (मणेरमाळ ) उचगाव यांच्यावतीने त्रिमूर्ती भक्त मंडळ, पाटील कॉलनी, छत्रपती शिवाजीनगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरात ७३ बाटल्या रक्त जमा केले.
प्रथमच घेण्यात आलेल्या या शिबिरात छत्रपती शिवाजीनगर उचगाव परिसरासह आसपासच्या भागातील रक्तदात्यांनी हजेरी लावली होती. तसेच गांधीनगर पोलीस ठाण्याचे सपोनि दीपक भांडवलकर यांनीही हजेरी लावली होती.
या शिबिरासाठी भागातील युवक, युवती, ज्येष्ठ मंडळी, मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांचे सहकार्य लाभले, तर शिबिरासाठी जीवनधारा ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले.
फोटो :
संयुक्त छत्रपती शिवाजीनगरच्या रक्तदान शिबिरात ७३ रक्तदात्यांनी केले रक्तदान. त्यांना प्रमाणपत्र वितरण करताना मान्यवर.