यावेळी हुपरी शहरात २१७, तळंदगे ८०, पट्टण कोडोली २१०, यळगूड ९३, इंगळी ९२, रेंदाळमध्ये ८५ बाटल्या असे मिळून ७८१ बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. रक्तदान केलेल्या प्रत्येक रक्तदात्यास हुपरी पोलिसांच्यावतीने सन्मानपत्र देऊन सहायक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांच्याहस्ते गौरवण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक गिरी यांनी विशेष परिश्रम घेऊन हे शिबिर यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल हुपरी पत्रकार संघटनेच्यावतीने त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच हे शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिसरातील सर्व मंडळांनी सहकार्य केल्याबद्दल पोलीस ठाण्याच्यावतीने आभार मानण्यात आले. लायन्स ब्लड बँक, इचलकरंजी, अर्पण ब्लड बँक, कोल्हापूर, आधार ब्लड बँक, इचलकरंजी, जीवनधारा ब्लड बँक, इचलकरंजी, संजीवन ब्लड बॅंक, कोल्हापूर व श्री आचार्य तुलसी ब्लड बॅंक, जयसिंगपूर या ब्लड बँकांनी रक्त संकलन करून आपला सहभाग नोंदविला.
हुपरी पोलीस ठाण्याच्यावतीने रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:26 IST