शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हा तर दाभोलकरांच्या विचारांचा खून

By admin | Updated: July 23, 2014 22:41 IST

‘अंनिस’ कार्यकर्ते आक्रमक : आता तरी अनास्था सोडा; पोळ व इतरांवर कारवाई करा

सातारा : अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीतील अग्रणी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करताना त्यांच्याच आत्म्याला पाचारण करण्याचा प्रकार चित्रफितीद्वारे उघड झाला आहे. हा दाभोलकरांच्या विचारांचा खून आहे, अशी जळजळीत प्रतिक्रिया दाभोलकर यांचे चिरंजीव डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली. ही चित्रफीत प्रदर्शित झाल्यापासून ‘अंनिसचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले असून, पोळ आणि इतरांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करीत आहेत.पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास करण्यासाठी जादूटोण्याचा मार्ग स्वीकारला होता, हे पत्रकार आशिष खेतान यांनी जारी केलेल्या चित्रफितींमधून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोळ यांच्यावर आता शासनाने कारवाई केलीच पाहिजे, यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आग्रह धरला आहे.सातारा हा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीचा बालेकिल्ला आहे. डॉ. दाभोलकर यांनी येथूनच अंधश्रद्धांचा नायनाट करण्याच्या विवेकवादी चळवळीची सुरुवात केली. त्यामुळे सातारचे कार्यकर्ते पोळ यांचा व्हिडिओ पाहून अधिक आक्रमकपणे त्यांच्यावर कारवाईची मागणी करू लागले आहेत. कार्यकर्त्यांनी सांगितले की, मुंबई पोलीस अ‍ॅक्टमध्ये पोलिसांनी तपास किंवा कारवाई कशी करावी, याबद्दल एक स्पष्ट चौकट आखून दिली आहे. त्यात अशा बुवाबाजीला थारा नाही. तसेच देशाच्या घटनेनुसार वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य मानले गेले आहे. पोलीस दलासारख्या यंत्रणेत या दोहोंचे उल्लंघन होणे गंभीर असून, नियमानुसार कारवाई करणे ही जबाबदारी राज्य शासनाची आहे. पोळ यांनी निवृत्त हवालदार मनीष ठाकूर आणि आदीनकर यांच्या मदतीने प्लँचेटसारखे उपाय तपासकामी वापरल्याचे ‘स्टिंग आॅपरेशन’मधून उघड झाले आहे. गृहखाते यापूर्वी तसे पुरावे मागत होते. आता पुरावे समोर असल्यामुळे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी अनास्था सोडून याप्रकरणी कठोर कारवाई केलीच पाहिजे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)लोकआयोग स्थापून याचिका दाखल करूसमितीने यापूर्वीच पुण्याच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडे यासंदर्भात पोळ व इतरांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तसेच, दौंड पोलीस ठाण्यात मनीष ठाकूर आणि आदीनकर यांच्याविरुद्ध रीतसर फिर्याद दिली आहे. या तक्रारींवर कारवाई होणार नसेल, तर समिती लोकआयोग तयार करेल आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल करेल, असे समितीचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत पोतदार यांनी सांगितले.गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या घटनेसंदर्भात दाखविलेली कमालीची उदासीनता अत्यंत वेदनादायी आहे. तीन आठवडे उलटून गेले तरी ‘प्लँचेट’ प्रकरणाची साधी चौकशीही होत नाही, यातून सत्य लपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याची शंका येते. हा डॉक्टरांच्या विचारांचा खून असून, आता पुरावे समोर आले आहेत. आता तरी निष्पक्ष चौकशी केली जावी आणि शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावणाऱ्या या प्रकाराबद्दल संबंधितांवर कारवाई व्हावी, यासाठी आम्ही आग्रही आहोत.- डॉ. हमीद दाभोलकर