शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

सर्व भक्तांना गाभारा प्रवेशास मनाई करा

By admin | Updated: April 13, 2016 00:35 IST

गजानन मुनिश्वर, शिवकुमार शिंदे यांची याचिका

कोल्हापूर : गेले काही दिवस अंबाबाई गाभारा प्रवेशावरून वाद सुरू आहे. मूर्तीच्या सुरक्षेकरीता सर्वच भक्तांना गाभाऱ्यात प्रवेश देऊ नये, अशी याचिका दिवाणी न्यायालयात दाखल केल्याची माहिती गजानन विश्वनाथ मुनिश्वर यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. मुनिश्वर यांनी म्हटले आहे की, अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यात लोकांच्या श्वासोच्छवासामुळे प्रचंड प्रमाणात कार्बनडाय आॅक्साईडची निर्मिती होते. त्यामुळे मूर्ती खराब झाली आहे. गाभारा छोटा असल्याने त्यास एकही खिडकी नाही. पंखा आहे, मात्र अशुद्ध हवा तेथेच फिरते. काहीवेळा श्वासोच्छवासाच्या त्रासाने भक्तांवर औषधोपचारही करावे लागले आहेत. सन २००६ च्या पाडव्यादिवशी एक भक्त मृतदेखील झाला. तसेच मुक्त प्रवेशामुळे दर्शनरांग तासन्-तास रेंगाळत राहते याबाबत तत्कालीन पोलिस अधीक्षक यशस्वी यादव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या अहवालात येथे चेंगराचेंगरीसारखा प्रकार उद्भवू शकतो. छोट्या गाभाऱ्यामुळे भक्तांच्या स्वतंत्रपणे तपासणी करण्याची सोय करता येत नाही. त्यामुळे महिलांना गाभाऱ्यात दर्शन देणे उचित ठरणार नसल्याचे म्हटले आहे. त्यातच भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आज, बुधवारी ५०० महिलांसह गाभाऱ्यात जाण्याची धमकी दिली आहे. या सर्व कारणांनी मूर्तीची सुरक्षितता महत्त्वाची मानून पुजारी व मदतनीसांना सोडून अन्य कोणालाही प्रवेश देऊ नये म्हणून कायम मनाई ताकीद करावी. या याचिकेबाबत सुनावणी दि. १६ एप्रिलला होणार आहे.