शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

अंध अमरजितसिंग यांचा मॅरेथॉन धावण्याचा निर्धार बासष्ठ वर्षांचे ‘तरुण’ : आजपर्यंत ८३ वेळा अर्धमॅरेथॉन सहज पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:36 IST

कोल्हापूर : दोन्ही डोळ्यांनी पूर्णत: दिसत नसतानाही नाशिक, औरंगाबाद व नागपूर येथे आयोजित केलेल्या लोकमत महामॅरेथॉनमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले ६२ वर्षांचे अमरजितसिंग चावला हे आज,

कोल्हापूर : दोन्ही डोळ्यांनी पूर्णत: दिसत नसतानाही नाशिक, औरंगाबाद व नागपूर येथे आयोजित केलेल्या लोकमत महामॅरेथॉनमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले ६२ वर्षांचे अमरजितसिंग चावला हे आज, रविवारी होणाºया महामॅरेथॉनमध्ये २१ किलोमीटरच्या स्पर्धेत धावणार आहेत.

मूळचे मुंबईकर असलेल्या चावला यांनी नागपूर येथे झालेली २१ किलोमीटर अर्धमॅरेथॉन पूर्ण करीत उपस्थितांचे लक्ष वेधले होते. वयाच्या ४९ व्या वर्षी अर्धमॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्यापासून त्यांनी आतापर्यंत ८३ अर्धमॅरेथॉन सहजरीत्या पूर्ण केल्या आहेत. यासह दहावेळा पुणे मॅरेथान व तीनवेळा अल्ट्रा रन (दीर्घ धावणे) पूर्ण तसेच ४९ वेळा १० किलोमीटर शर्यत पूर्ण करणारे चावला यांचे लक्ष्य १०१ अर्धमॅरेथॉन पूर्ण करणे हे आहे.

बीब कलेक्शनसाठी आलेले चावला एस्कॉर्ट असलेले युवा लाझर नाडर व डॉ. अमितसिंग माने यांच्यासह कोल्हापुरात दाखल झाले. याबाबत बोलताना धावपटू चावला म्हणाले, कोल्हापुरातील ‘लोकमत’ची ही माझी ८४वी मॅरेथॉन आहे. वयाच्या तेराव्या वर्षी ‘मॅकेलर डिजनरेशन’ या असाध्य आजाराने माझी दृष्टी कमी आली. त्यानंतर ४०व्या वर्षी मला दोन्ही डोळ्यांना दिसणे पूर्णत: बंद झाले. यावर मी जीवनात हरलो नाही. आयुष्यात काहीतरी करण्यासाठी माझे मन मला काही स्वस्थ बसू देईना. २००५ साली वयाच्या ४९व्या वर्षी मी एका शर्यतीत सहभाग घेतला आणि ती पूर्णही केली. त्यानंतर मी मागे बघितले नाही. ‘लोकमत सर्किट रन’च्या रूपाने हा उपक्रम सर्वांना धावण्याची सवय लावण्यासारखा आहे. तुम्हीही सवय लावून घ्या. मला शंभरपेक्षा अधिक मॅरेथॉनमध्ये धावायचे आहे.