गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत चालला आहे. घराचा आसरा नसणारे फिरस्ते, विक्रेते, भिकारी, रस्त्याने फिरणारे वेडे हे या थंडीने हवालदील झाले आहेत. याची जाणीव झाल्याने इचलकरंजी व मिरज बसस्थानक परिसरात उघड्यावर झोपलेल्यांना मायेची ऊब मिळावी, त्यांचे थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी सामाजिक कार्यात सातत्याने आघाडीवर असलेल्या सिल्व्हर बॉईजच्या कार्यकर्त्यांनी ४० जणांना ब्लँकेट दिली. या सामाजिक उपक्रमामध्ये सिल्व्हर बॉईज या संघटनेचे रवी नाईक, सरदार हलसवडे, शीतल मोरबाळे, जितू देवकर, सौरभ गोडखिंडे, योगेश जाधव, अशोक चौगुले, राहुल बेलेकर, आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
--------::--------
फोटो ओळी - इचलकरंजी व मिरज बस स्थानक परिसरात उघड्यावरच झोपलेल्यांचे कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण व्हावे, त्यांना मायेची ऊब मिळावी या उदात्त हेतूने हुपरी (ता. हातकणंगले) येथील सिल्व्हर बॉईजच्या कार्यकर्त्यांनी उबदार ब्लँकेट वितरित केले.