शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
6
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
7
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
8
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
9
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
10
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
11
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
12
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
13
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
14
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
15
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
16
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
17
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
18
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
19
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
20
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!

तत्कालीन ग्रामसेवकावर ठपका

By admin | Updated: January 10, 2015 00:21 IST

अनधिकृत बांधकाम प्रकरण : खातेनिहाय चौकशी अहवालात स्पष्ट; पुढील कारवाईकडे लक्ष

कोल्हापूर : उचगाव (ता. करवीर) ग्रामपंचायतीमधील तत्कालीन ग्रामसेवक एकनाथ सदाशिव सूर्यवंशी यांची सहायक आयुक्तांनी खातेनिहाय चौकशी केली. चौकशीत अनियमित, नियमबाह्य कामकाज, अनधिकृत बांधकामास परवानगी देऊन कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका सूर्यवंशी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सूर्यवंशी यांच्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सन २०१० मध्ये सूर्यवंशी ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. उचगाव गावास इचलकरंजी प्रादेशिक असंविधानिक विकास योजना लागू आहे. या योजनेचे नियोजन प्राधिकारी हे जिल्हाधिकारी आहेत.त्यामुळे गावठाण हद्दीबाहेर इमारत बांधकाम करण्यापूर्वी जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. तथापि, उचगाव येथील रि. स. नंबर ८४/८७, ९१, ९२ ते १०३, १२४, १४४, १४६ ते १४८ या सर्व उचगाव मिळकती महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये सामाविष्ट आहेत. आरक्षण क्रमांक २५७ कचरा टेपोसाठी व आरक्षण क्रमांक १५८ ट्रक टर्मिनस विकास विभागामध्ये दर्शविला आहे. दरम्यान, सूर्यवंशी यांनी आपल्या कालावधीत रि. स. नंबर ८४/८७, ९१, ९२ ते ९६, १०० ते १०३, १२४, १४४, १४६ ते १४८ मध्ये बांधकामास नियमबाह्य परवानगी दिली. कागदपत्रांची खातरजमा न करता अनधिकृत बांधकामांना परवानगी दिली आहे. नियमापेक्षा जादा मजले बांधकामसही परवानगी दिली आहे. या प्रकरणात कर्तव्यात कसूर केली आहे.दरम्यान, अतिक्रमणाची तक्रार माजी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल कदम यांनी केली होती. १८ जून २०१२ रोजी बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधकाम केलेल्यांवर कारवाई करावी, अशी शिफारस नगरविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली होती. मात्र, तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तत्कालीन गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांना संगनमताने अभय दिले. या प्रकरणात दोषी ग्रामसेवक तलाठी यांच्यावर कारवाई करावी, अशीही तक्रार कदम यांनी केली आहे. या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)