शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘भाजप’च्या कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीवर तोंडसुख

By admin | Updated: June 7, 2015 01:27 IST

प्रतिमोर्चा : कार्यकर्ते दादांच्या दारात; कार्यकर्त्यांची नाळ घट्ट झाल्याचा चंद्रकांतदादा पाटील यांचा विश्वास

कोल्हापूर : जिल्हा बॅँकेत १४२ कोटी रुपयांचा घोटाळा केलात, यानंतर सत्तेवरून पायउतार होताच गेल्या सहा महिन्यांत चंद्रकांतदादांकडून मागील दाराने कामे करून घेतली. स्वत:च्या चैनीसाठी सहकारात स्वाहाकार माजविणाऱ्यांना आमचे मानबिंदू असलेल्या मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा अधिकार नाही. मोर्चा, आंदोलने करून निवेदने देण्याचा सर्वांना अधिकार आहे. मात्र, त्यासाठी घर हे ठिकाण नव्हे. आता केली एवढी चूकबस्स झाली, पुन्हा अशी चूक कराल, तर याद राखा, अशा शब्दांत ‘भाजप’च्या कार्यकर्त्यांनी आमदार हसन मुश्रीफ व राष्ट्रवादीवर शनिवारी प्रतिमोर्चानिमित्त तोंडसूख घेतले. राष्ट्रवादी कॉँग्रेसने मंत्री पाटील यांच्या संभाजीनगर परिसरातील नाळे कॉलनी येथील निवासस्थानी मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते. राष्ट्रवादीच्या या मोर्चास शह देण्यासाठी पाटील यांच्या घराजवळ जिल्ह्णातून आलेले कार्यकर्ते जमा झाले होते. सकाळी दहा वाजल्यांपासून दुपारी तीनपर्यंत कार्यकर्ते एका ठिकाणी बसून होते. यावेळी भाजपच्या जिल्ह्णातील प्रमुख कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांनी भाषणात हसन मुश्रीफ यांच्यावर कडाडून टीका केली. जिल्ह्णातील सर्व प्रश्न मंत्री पाटील यांच्या प्रयत्नामुळे सुटण्याच्या मार्गावर आहेत. अशा पद्धतीनेच पाटील यांचा कामाचा धडका सुरू राहिल्यास आपले काही खरे नाही, या भीतीनेच जिल्ह्णाचे नेते म्हणून घेण्याची सवय लागलेल्या हसन मुश्रीफ यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या मानसिकतेतून निव्वळ स्टंटबाजीच्या हेतूनेच राष्ट्रवादीने पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला असल्याचे ‘भाजप’चे जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले. महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची गाडी २६ वरून ६ वर येणार आहे. प्रसिद्धी मिळविण्यासाठी स्टंटबाजी करणे राष्ट्रवादीने सोडून द्यावे, असे नगरसेवक सुभाष रामुगडे यांनी सांगितले. आमदार महाडिक यांची उपस्थिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानाजवळ भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रतिमोर्चाचे आयोजन केले होते. त्या ठिकाणी आमदार अमल महाडिक यांनी सकाळी दहा वाजता भेट दिली. त्यानंतर दुपारी मोर्चा सुरू झाल्यानंतरही ते पालकमंत्र्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोर्चालाही सामोरे गेले.(प्रतिनिधी)