शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

कोल्हापूर महापौरपदाबाबत भाजपची तलवार म्यान

By admin | Updated: November 14, 2015 00:31 IST

चंद्रकांतदादाचा ‘यू टर्न’ : विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावणार

कोल्हापूर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भरवशावर अवलंबून राहिलेल्या कोहापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी अचानक ‘यू टर्न’ घेत महापौरपदाच्या निवडणुकीत आपली ‘तलवार म्यान’ केली. गेले काही दिवस महापौर-उपमहापौर निवडणुकीत चमत्कार घडविण्याची भाषा करणाऱ्या पालकमंत्री पाटील यांनी आता महापालिका सभागृहात भाजप-ताराराणी आघाडीने एक प्रबळ ‘विरोधी पक्ष’ म्हणून बसण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. त्यामुळे आता काँग्रेसचे महापौर व राष्ट्रवादीचे उपमहापौर होण्यातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आम्हाला भाजप किंवा ताराराणी आघाडीचा महापौर करण्यासाठी मदत करण्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या जोरावर आम्ही ‘चमत्काराची भाषा’ केली होती परंतु गुरुवारी त्यांनीच आता हे अशक्य असल्याचा निरोप पाठविला. त्यामुळे भाजप व ताराराणी आघाडीने महानगरपालिका सभागृहात ‘विरोधी पक्ष’ म्हणून भूमिका बजावण्याचे ठरविले आहे, असे पालकमंत्री पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीकडे ४४ इतके संख्याबळ आहे, तर शिवसेनेचे चार नगरसेवक धरून भाजप-ताराराणी आघाडीकडे ३७ नगरसेवक आहेत. संख्याबळाचा विचार करता काँग्रेस व राष्ट्रवादीचे महापौर-उपमहापौर होणार हे स्पष्ट असतानाही आठ दहा दिवसांपासून पालकमंत्री ‘भाजपचाच महापौर होईल’, असे ठामपणे सांगत होते; परंतु शुक्रवारी अचानक त्यांनी महापालिका सभागृहात भाजप-ताराराणीचे नगरसेवक एक प्रबळ ‘विरोधी पक्ष’ म्हणून आपली भूमिका बजावतील, असे सांगून टाकले. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. कोल्हापूर महानगरपालिकेतही सत्तेपर्यंत पोहोचण्यात अगदी काही जागा कमी पडल्या म्हणून आम्ही राष्ट्रवादीचे सहकार्य मागितले होते. महानगरपालिकेत आम्ही सत्तेवर आलो तर शहराच्या विकासात अधिक सुसूत्रता आणि सोपेपणा येईल, असे चंद्रकांतदादा म्हणाले.घोडेबाजार ही आमची संस्कृती नव्हेमहापालिकेत नगरसेवकांना फोडून घोडेबाजार करणे ही आमची संस्कृती नाही. आम्हाला तसे करायचेही नाही. आमच्या चमत्कारात घोडेबाजार बसत नाही. ‘ताराराणी’चा महापौर करावा, आम्ही बाहेर थांबतो असा शेवटचा प्रस्ताव आम्ही राष्ट्रवादीकडे दिला होता. भाजप बाहेर थांबल्यास ते मदत करतील, अशी अपेक्षा होती; परंतु त्यासही नकार दिला गेला. त्यामुळे राष्ट्रवादीचे एकत्रित १५ नगरसेवक येणार नसतील तर आपण विरोधी पक्षात बसावे, अशा निष्कर्षाप्रत पोहोचलो. कोणावर दबाव टाकण्याचा व धमकावण्याचा प्रयत्न आमच्याकडून होणार नाही, असे पाटील म्हणाले.