शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
5
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
6
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
7
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
8
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
9
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
10
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
11
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
12
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
13
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
14
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
16
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
17
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
18
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
19
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
20
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'

संभाजीराजेंसाठी भाजपचे ‘खास’दार

By admin | Updated: June 12, 2016 01:51 IST

राज्यसभेवर राष्ट्रपतींकडून नियुक्ती : मराठा आरक्षण, तरुणांचे संघटन यामुळे संधी

विश्वास पाटील / कोल्हापूर कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्यासाठी भारतीय जनता पक्षाने शनिवारी ‘खास’दार उघडले. त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. राज्यसभेवर जाणारे कोल्हापूरचे ते पहिले खासदार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजातील व राजघराण्याची पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीस संधी देऊन भाजपने एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. संभाजीराजे यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आल्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कार्यालयातून शनिवारी रात्री प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले. १६ राज्यांतील राज्यसभेच्या ५८ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. त्याचा निकाल शनिवारी सायंकाळी जाहीर झाला व त्यानंतर लगेचच राष्ट्रपती नियुक्त सदस्याच्या एका रिक्त जागेवर संभाजीराजेंची नियुक्ती करण्यात आली. गेल्या महिन्यात राष्ट्रपती नियुक्त १२ सदस्यांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये जागतिक गायत्री परिवाराचे प्रमुख डॉ. प्रणव पंड्या यांचा समावेश होता. मात्र, त्यांनी राज्यसभेचे सदस्यत्व स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे ही जागा रिक्त होती. मराठा आरक्षणासाठी राज्यभर केलेले दौरे, त्यातून मोठ्या प्रमाणात केलेले तरुणांचे संघटन आणि छत्रपती शाहू घराण्याची पुण्याई हीच संभाजीराजे यांना खासदार करण्यात कारणीभूत ठरली. लोकसभेला पराभव झाल्यानंतर ते पक्षीय राजकारणापासून बाजूला पडले तरी सामाजिक कार्यात सक्रिय राहिले. मी जे काम करीत आहे, ते योग्य असेल तर राजकीय पक्ष त्याची कधी ना कधी दखल घेतील, अशी भावना ते व्यक्त करीत राहिले. घडलेही तसेच. संभाजीराजे यांच्या नियुक्तीचा भाजपला किती राजकीय लाभ मिळेल ही लांबची गोष्ट असली, तरी भाजपचे पश्चिम महाराष्ट्रावर अधिक लक्ष असल्याचेही या नियुक्तीने अधोरेखित केले. त्यांची नियुक्ती सामाजिक काम या निकषावर झाली आहे. स्वच्छ प्रतिमेचे उमदे तरुण आणि राजर्षी शाहू घराण्याचा वारसा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना लोकसभेच्या २००९ च्या निवडणुकीत संधी दिली. त्यावेळी उमेदवारी देताना पक्षाने बराच घोळ घातला. संभाजीराजे यांच्यासह धनंजय महाडिक व दिवंगत नेते विक्रमसिंह घाटगे यांच्यात रस्सीखेच झाली. त्यात संभाजीराजे यांनी बाजी मारली. दोन्ही काँग्रेसचे प्राबल्य असल्याने ही निवडणूक एकतर्फी होणार आणि संभाजीराजे निवडून येणार असे चित्र पहिल्या टप्प्यात तयार झाले, परंतु पुढे या लढतीला तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी भावनिक स्वरूप दिले. त्यांनी संभाजीराजे यांच्यापेक्षा ही लढत शरद पवार यांच्या विरोधातील लढाई या वळणावर नेली. त्यात महाडिक कुटुंबीयांनीही त्यांना मदत केली. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम म्हणून संभाजीराजे हे ४४ हजार ८०० मतांनी मंडलिक यांच्याकडून पराभूत झाले. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते सुरुवातीला काही दिवस राष्ट्रवादीत सक्रिय राहिले, परंतु त्यांना पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाचा अत्यंत वाईट अनुभव आला. पक्षाचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी त्यांचे कधीच सूत जुळले नाही. त्यामुळे त्यांनी राजकारणातून बाजूला होऊन सामाजिक कार्याकडे लक्ष दिले. मराठा आरक्षणासाठी त्यांनी राज्यभर मेळावे घेतले. या मेळाव्यांना मुख्यत: मराठवाडा, विदर्भात तरुणांचे पाठबळ मिळाले. रायगडावर गेली अकरा वर्षे ते शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करीत आहेत. त्यातूनही त्यांची प्रतिमा उंचावली. त्यामुळे लोकसभेच्या गत निवडणुकीतच त्यांच्या उमेदवारीची शिवसेनेकडून जोरदार हवा होती. त्या पक्षाने त्यांना त्यासंबंधी थेट विचारणाही केली होती, परंतु त्यांनी आपण सामाजिक कामातच खूश असल्याचे सांगून ही संधी नाकारली. आता याच सामाजिक कामाने त्यांना राज्यसभेत नेऊन पोहोचविले. तीन खासदार संभाजीराजे खासदार झाल्यामुळे जिल्ह्याला आता तीन खासदार मिळाले आहेत. कोल्हापुरातून राष्ट्रवादीतर्फे धनंजय महाडिक, हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी लोकसभेचे खासदार आहेत. असे आहेत संभाजीराजे... नाव : युवराज छत्रपती संभाजीराजे जन्मतारीख : ११ फेब्रुवारी १९७१ शिक्षण : सायबर कॉलेजमधून एमबीए पत्नी : छत्तीसगडच्या युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती मुलगा : युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती (सध्या पुण्यातील सिम्बायसिस महाविद्यालयात बारावीत शिकतो.) पदे : पुण्यातील आॅल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे उपाध्यक्ष कोल्हापुरातील भवानी मंडपातील छत्रपती चॅरिटेबल ट्र्स्टचे अध्यक्ष शिव-शाहू मंच व सह्याद्री प्रतिष्ठानचे चीफ पेट्रन राजकीय कारकीर्द : संभाजीराजे तसे कोणत्याच पक्षाचे सुरुवातीला सक्रिय कार्यकर्ते नव्हते. त्यांचे भाऊ युवराज मालोजीराजे काँग्रेसकडून आमदार झाले तरी ते त्या पक्षातही कधी सक्रिय नव्हते. लोकसभेच्या २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे बंडखोर नेते सदाशिवराव मंडलिक यांना शह देण्यासाठी नवीन चेहरा व शाहू घराण्याचाच वारसदार म्हणून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसक डून उमेदवारी मिळाली, परंतु त्यामध्ये त्यांचा मंडलिक यांच्याकडून ४४ हजार ८०० मतांनी पराभव. सात वर्षानंतर वाड्यावर आनंदोत्सव २००९ च्या लोकसभा निवडणूकीत संभाजीराजे छत्रपतींचा तर विधानसभा निवडणूकीत मालोजीराजे छत्रपतींचा झालेल्या पराभवामुळे कार्यकर्त्यांत काहीसी मरगळ आली होती. पण संभाजीराजे यांना राज्यसभेवर संधी मिळाल्याने तब्बल सात वर्षानंतर कार्यकर्त्यांसह वाड्यावर आंनदोत्सव साजरा झाला. छत्रपती घराण्यास उभारी.... छत्रपती संभाजीराजे यांचा लोकसभेला, तर त्यांचे धाकटे बंधू मालोजीराजेयांचा विधानसभेला पराभव झाला होता. गत विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसकडून थेट मालोजीराजे यांना पक्षाकडून तिकीट देऊ केले होते. मात्र त्यांनी ते नाकारले. छत्रपती राजघराण्याचा राजकीय दबदबा असूनसुद्धा हे घराणे राजकारणापासून अलिप्त राहिले होते. आता मात्र संभाजीराजे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यामुळे पुन्हा एकदा छत्रपती घराण्यास उभारी मिळाली आहे. छत्रपती घराण्यातील दुसरे खासदार संभाजीराजे छत्रपती यांना भाजपकडून राज्यसभेतून राष्ट्रपती नियुक्त खासदारकी मिळाली असली तरी यापूर्वी कोल्हापुरातून याच घराण्यातील विजयमाला राणीसाहेब या १९६७ च्या लोकसभा निवडणुकीत अत्यंत चुरशीच्या लढतीत मेजर जनरल एस.पी.पी. थोरात यांचा पराभव करीत विजयी झाल्या होत्या. त्यावेळी कोल्हापूरच्या समाजकारणात दत्तक विधानाचा प्रश्न ऐरणीवर होता. त्याच्यावर स्वार होऊन शेकापक्षाने विजयमाला राणीसाहेब यांना उमेदवारी दिली आणि राजघराण्यावर प्रेम करणाऱ्या कोल्हापूरच्या जनतेने विजयमाला राणीसाहेब यांना खासदार केले. त्यानंतर तब्बल ४९ वर्षांनी छत्रपती घराण्यात खासदारकी चालत आली. राज्यसभेवरील कोल्हापूरचे पहिले खासदार कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासात संभाजीराजेंना प्रथमच राज्यसभेत जाण्याची संधी मिळाली. शेजारच्या सांगली जिल्ह्यातून आबासाहेब खेबुडकर, हिंदकेसरी मारुती माने, गुलाबराव पाटील, डी. जी. पाटील, विश्वास दाजी पाटील, आदींना राज्यसभेवर संधी मिळाली होती; परंतु कोल्हापूरचा आवाज राज्यसभेत उमटला नव्हता. आज कार्यकर्त्यांना भेटणार आज, रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास युवराज संभाजीराजे छत्रपती हे न्यू पॅलेस येथे आपल्या निवासस्थानी येणार आहेत. तेथून काही वेळातच श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत भवानी मंडप येथे कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपस्थित राहणार आहेत.