शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या ‘सोशल मीडिया’ची ग्रामीण भागावर नजर

By admin | Updated: July 25, 2014 22:15 IST

कार्यशाळेत चर्चा : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना करणार लक्ष्य

सातारा : भारतीय जनता पार्टीचा स्वतंत्र सेल असलेल्या ‘सोशल मीडिया’ने सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार केला आहे. हे करत असताना नेमके काय करावे लागणार आहे, याची माहिती शुक्रवारी सातारा येथील कार्यशाळेत देण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील त्याचबरोबर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना लक्ष्य करण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी ‘सोशल मीडिया सेल’चे प्रदेशाध्यक्ष जितेन गजारिया, सहसंयोजक मंदार घाटे, अनुप सूर्यवंशी, भाजपच्या शहराध्यक्षा सुवर्णादेवी पाटील, निखील झगडे, विजय काटवटे यांची प्रमुख उपस्थिती होती.सोशल मीडियाच्या माध्यमातून जिव्हाळ्याचे प्रश्न हाताळत असताना ग्रामीण भागातील नेमक्या समस्या काय आहेत, महिला आणि युवक-युवती त्याचबरोबर सुशिक्षित बेरोजगारांचे नेमके प्रश्न काय आहेत, यावर भर देण्याची सूचनाही करण्यात आली. सोशल मीडिया सेलची सातारा जिल्ह्याची स्वतंत्र बेवसाईट निर्माण करण्याबरोबर प्रत्येक विधानसभा मतदार संघाची एक वार रूम राहील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्रात भाजपचे सरकार आले आणि नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाले. त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात करण्याच्या अनुषंगाने सोशल मीडियावर भर देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी प्रमुख मान्यवरांनी दिली.सोशल मीडियाचा वापर करत असताना भाषाही जपून वापरण्याबरोबरच कोणाच्या भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले. या कार्यशाळेत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिला व युवकांचीही यावेळी हजेरी होती. (प्रतिनिधी)