शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

नाराजी टाळण्यासाठी भाजपची नरमाई

By admin | Updated: December 28, 2015 00:29 IST

तासगाव नगरपालिका उपनगराध्यक्ष बदल : राजीनाम्याबाबत आज नगरसेवकांची बैठक

तासगाव : आबा गटाचे उपनगराध्यक्ष सुरेश थोरात यांच्या राजीनाम्याबाबत नगरसेवकांचा दबाव आहे. मात्र तरीदेखील भाजपला पाठिंबा दिलेल्या आबा गटातील नगरसेवकांची नाराजी पत्करावी लागू नये, यासाठी भाजपने राजीनाम्याबाबत नरमाईची भूमिका घेतल्याची चर्चा आहे. उपनगराध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत सोमवारी सत्ताधारी गटाची बैठक होणार आहे.पालिकेत सद्यस्थितीत भाजप आणि आबा गटांतर्गत असणारा एक गट, अशीच सत्ता आहे. आबा गटातील काही नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपकडे एकहाती सत्ता आहे. तरीदेखील भाजपने आबा गटाकडे उपनगराध्यक्ष पद कायम ठेवून सत्तेत सोबत घेतले आहे. मात्र भाजपकडून दोन महिन्यात नगराध्यक्ष बदलल्यानंतर भाजप-राष्ट्रवादीच्या सत्तेतील घरोब्याबाबत चर्चा होऊ लागली. त्यातच उपनगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांकडून उपनगराध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत दबाव वाढू लागला. त्यामुळे सुरेश थोरात यांना राजीनामा देण्याच्या सूचना पक्षप्रतोद अनिल कुत्ते यांनी केल्या. आठ दिवसांचा कालावधी झाल्यानंतरही थोरात यांनी राजीनामा दिला नाही. याउलट नगरसेवक अजय पाटील यांच्याशी चर्चेनंतरच राजीनाम्याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले.पालिकेत वर्चस्व नसतानादेखील भाजपच्या नगरसेवकांनी तत्कालीन नगराध्यक्ष अजय पवार यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. त्याच घडामोडीत एकहाती वर्चस्व निर्माण करुन पालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्यातदेखील यश मिळविले होते. मात्र उपनगराध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत भाजपने नरमाईची भूमिका घेतली आहे. या भूमिकेची सध्या राजकीय वर्तुळातही उलट-सुलट चर्चा होत आहे. उपनगराध्यक्षांसोबत केवळ दोन नगरसेवक असतानादेखील त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरदेखील राजीनामा दिला नाही.तसेच भाजपच्या नगरसेवकांतून दबाव असतानादेखील भाजपने वेट अ‍ॅण्ड वॉचचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे भाजपची नरमाईची भूमिका कशासाठी? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोमवारी राजीनाम्यासंदर्भात सत्ताधारी गटातील नगरसेवकांची बैठक होत आहे. या बैठकीत तरी निर्णय होणार का? याची उत्सुकता आहे. उपनगराध्यक्ष सुरेश थोरात आबा गटाचे असले तरी, नगरपालिकेत ते भाजपसोबत सत्तेत आहेत. पालिकेत आबा गट आणि काका गटात सोयरिक आहे. मात्र उपनगराध्यक्ष थोरात यांनी सत्तेत सोबत राहूनदेखील भाजपविरोधी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे. काही दिवसांपूर्वी दुष्काळाच्या प्रश्नावर राष्ट्रवादीने आंदोलन केले होते, तर नुकतेच अवैध धंद्यांविरोधात लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या दोन्ही आंदोलनात थोरात सक्रिय होते. त्यांच्या निर्णयाकडे आता लक्ष लागून राहिले आहे. पालिकेत भाजपचे एकहाती वर्चस्व आहे. भाजपला पाठिंबा दिलेल्या आबा गटातील नगरसेवकांमुळे सद्य स्थितीत दोन नगरसेवकांचा अपवाद सोडल्यास अन्य सर्व नगरसेवक सत्ताधारी गटात आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या नगराध्यक्ष आणि सभापती निवडीत सत्ताधारी गटातीलच काही नगरसेवक नाराज झाले आहेत. तर उपनगराध्यक्षांच्या राजीनाम्यावरून भाजपला पाठिंबा दिलेला आबा गट नाराज झाल्यास, विरोधकांच्या संख्येत भर पडणार आहे. त्याचा परिणाम विकासकामांबाबतचे निर्णय घेताना होणार आहे. त्यामुळेच ही नाराजी टाळण्यासाठी भाजपकडून उपनगराध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत नरमाईची भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.तीन महिन्यांपूर्वी आबा गटातील काही नगरसेवकांना नगराध्यक्षपदाची आॅफर देऊन भाजपमध्ये प्रवेश करून घेतला होता. उपनगराध्यक्ष सुरेश थोरात आबा गटाशी एकनिष्ठ आहेत. त्यांनाही भाजपमध्ये घेऊन राष्ट्रवादीला धक्का देण्यासाठी भाजपकडून हालचाली झाल्या आहेत. थोरातांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर उपनगराध्यक्षपद कायम ठेवण्याची आॅफर भाजपकडून दिली असल्याची चर्चा आहे.